Janmarathi

जगातील सर्वाधिक फॉलो करणाऱ्या लोकांमध्ये मोदींचा पुन्हा समावेश.......!

जगातील सर्वाधिक फॉलो करणाऱ्या लोकांमध्ये मोदींचा पुन्हा समावेश.......!
X

जगातील सर्वाधिक फॉलो करणाऱ्या लोकांमध्ये मोदींचा पुन्हा समावेश.......!

मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर लोकप्रिय झालेल्या लोकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पहिल्या क्रमांकावर आहेत. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही पहिल्या दहामध्ये आहेत. ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येच्या आधारे ही नवीन यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये अव्वल १० क्रमांकांमध्ये केवळ दोन राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. यातील पहिले नाव अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आहे. त्यांच्यानंतर या लोकप्रिय व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे.

भारताचे पंतप्रधान वगळता कोणत्याही राष्ट्रपती किंवा पंतप्रधान किंवा वरिष्ठ नेत्याचे पीएम मोदींपेक्षा जास्त फॉलोअर्स नाहीत. या सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत दुसऱ्या स्थानी इलॉन मस्कचाही समावेश आहे. ओबामांनी पद सोडुन सहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण तरीही त्यांची लोकप्रियता कायम आहे. त्यांना १३ कोटी ३५ लाख लोक फॉलो करतात.

या यादीत इलॉन मस्क दुसऱ्या क्रमांकावर आहे. मस्कचे सध्या १२.७१ कोटी फॉलोअर्स आहेत. पॉप गायक जस्टिन बीबर तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर प्रसिद्ध गायिका केटी पेरी चौथ्या क्रमांकावर आहे. गायिका रिहाना आणि फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. सातव्या क्रमांकावर गायिका टेलर स्विफ्ट तर आठव्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.

Next Story