Janmarathi

Accident Video: साऊथ स्टार विशालचा मोठा अपघात थोडक्यात वाचला जीव, अभिनेत्याने शेयर केला भयंकर व्हिडीओ व्हायरल…

Accident Video:  साऊथ स्टार विशालचा मोठा अपघात थोडक्यात वाचला जीव, अभिनेत्याने शेयर केला भयंकर व्हिडीओ व्हायरल…
X

Accident Video: साऊथ स्टार विशालचा मोठा अपघात थोडक्यात वाचला जीव, अभिनेत्याने शेयर केला भयंकर व्हिडीओ व्हायरल…

साउथ इंडस्ट्रीजचा स्टार अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी नुकताच मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला आहे. साउथ स्टार विशाल हा त्याच्या आगामी चित्रपट 'मार्क अँटोनी' चित्रपटाची शुटींग करत होता तेव्हा सेटवर एक मोठा अपघात झाला. जे झाले ते पाहून विशाल देखील घाबरला आणि तो, हे सर्व बघून देवाचे आभार मानत आहे. विशालने या घटनेचा भयंकर व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर केला आहे.

विशाल कृष्णा रेड्डी हे ,मार्क अँटोनी' चित्रपटाची शुटींग करत होते. सेटवर कास्ट आणि क्रू सोबत खूप लोकांची गर्दी होती. सेटवर एक महत्वाचा सीन्स् शूट केला जात होता आणि सीक्वेंसमध्ये ट्रकचा देखील वापर केला जात होता. हा सीन्स् शूट करत असताना अचानकच ट्रकचा ताबा सुटला आणि ट्रक स्पीडने तसाच पुढे आला. जिथे ज्युनियर आर्टिस्ट आपल्या शॉटसाठी तयार होते तर सोबत विशाल देखील होता. सीननुसार ट्रकला एक भिंत फोडून निघाल्यानंतर थांबायला हवे होते पण ट्रकचा ताबा सुटला आणि तो न थांबता तसाच पुढे आला. तथापि ट्रक सर्वाना लवकर दिसला आणि सर्वजण बाजूला हटले. पण विशाल वेगाने येत असलेल्या ट्रकपासून अवघ्या काही अंतराने वाचला, जे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. अस म्हंटले जात आहे कि ट्रकमध्ये काहीतरी बिघाड झाला होता ज्यामुळे ट्रकचा ताबा सुटला.

विशाल कृष्ण रेड्डीने या घटनेचा व्हिडीओ स्वतःच्या ट्विटर हँडलवरून शेयर केला आहे आणि लिहिले आहे कि अवघ्या काही सेकंद आणि काही इंचाच्या अंतराने माझा जीव वाचला, मी देवाचे आभार मानतो. या घटनेमुळे मी सुन्न झालो आहे. तथापि आता मी ठीक आहे आणि शुटींगवर परतलो आहे.

Next Story