Janmarathi

Animal Video: पिसाळलेला हत्ती गर्दीत घुसला..! सगळ सोडून लोक पळू लागले, पण हत्तीन लोकांना नाही सोडले......!

Animal Video: पिसाळलेला हत्ती गर्दीत घुसला..! सगळ सोडून लोक पळू लागले, पण हत्तीन लोकांना नाही सोडले......!
X

Animal Video: पिसाळलेला हत्ती गर्दीत घुसला..! सगळ सोडून लोक पळू लागले, पण हत्तीन लोकांना नाही सोडले......!

वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यातील अनेक व्हिडिओ असे आहेत की ते पाहणारे आश्चर्यचकित होतात. नुकताच एका महाकाय हत्तीचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक हत्ती जंगलातून जाणाऱ्या वाहनातून ऊस काढून खाताना दिसत होता. ते पाहून हत्तीने जंगलातून जाण्यासाठी चालकाकडून टोल टॅक्स वसूल केल्याचे नेटकरी म्हणाले. या विडिओ मध्ये हत्ती शहरातील रस्त्यांवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. हत्ती शरीराने खूप मजबूत असतात. मोठमोठी वाहनेही त्यांच्या शक्तीसमोर अपयशी ठरतात. ग्रामीण भागात तसेच जंगलांच्या परिसरात हत्ती अनेकदा लोकांवर हल्ला करताना दिसतात.

नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, एक पिसाळलेला हत्ती रस्त्यावर धावताना दिसत आहे, यावेळी तो बाईक आणि कार उचलून फेकताना दिसत आहे. हत्तीचे हे भीषण रूप पाहून लोकही भीतीने सैरावैरा धावू लागले. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर @Fun_Viral_Vids नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला काही लोक अचानक इकडे तिकडे रस्त्यावर धावू लागल्याचे दिसत आहे. त्यानंतर रस्त्याच्या कडेला स्कूटी पार्क करणाऱ्या व्यक्तीवर हत्ती हल्ला करतो आणि नंतर स्कूटी तुडवतो. व्हिडिओमध्ये काही लोक हत्तीचा पाठलाग करताना दिसत आहेत आणि त्याचा व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आत्तापार्येंत १.४ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. त्याला १८ हजारांहून अधिक लोकांनी लाइकही केले आहे. व्हिडिओवर कमेंट करताना अनेकांनी हा हत्ती खूप खतरनाक असल्याचे सांगितले आहे.

Next Story
Share it