Janmarathi

भाजपची बैठक - तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेणार.

आज डेहराडून येथे झालेल्या भाजप बैठकीत चर्चेतील नावांना मागे टाकून सभागृहाचे नेतेपद मिळवले.

भाजपची बैठक - तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेणार.
X

मागील दोन दिवसांपासून उत्तराखंडातील राजकीय परिस्थिती तणावाची बनली होती. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या बाबत भाजप आमदारांनी पक्षाकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर मंगळवारी त्यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा दिवसभर चालत होती. भाजपचे राष्ट्रीय अध्याक्ष श्र. जे. पी. नड्डा यांच्यासोबत त्रिवेंद्र रावत यांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला होता.

त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळातील धनसिंह रावत, लोकसभेचे खासदार अजय भट्ट, राज्यसभा खासदार अनिल बलुनी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हि चार नावे मुख्यमंत्री पदाच्या पात्रतेच्या चर्चेत होती. परंतु आज डेहराडून येथे झालेल्या बैठकीत या चारही नावांना मागे टाकत तिरथ सिंह रावत यांनी सभागृह नेतेपद मिळवले आहे. तिरथ रावत हे गढवाल लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. ते उत्तराखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत व सध्या भाजपचे राष्ट्रीय सचिवपदावर आहेत.

तिरथ सिंह रावत आज १० मार्चच्या संध्याकाळी मुख्यामंत्रीपदाची शपथ घेतील असे म्हटले जात आहे.

Next Story