Farmar Story: एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीला शाळेत फीस मागितली जाते तेव्हां.........!

Farmar Story: एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीला शाळेत फीस मागितली जाते तेव्हां.........!
शाळेच्या मुख्याध्यापकांनी एका शेतकऱ्याची मुलगी खुशी हिला अत्यंत कठोर शब्दात गेल्या एक वर्षाच्या शाळेच्या फीसची विचारणा केली तेव्हा खुशी म्हणाली, 'मॅडम, मी आज घरी जाऊन वडिलांना सांगते'. घरी आल्यावर ख़ुशी तिच्या बाबाला शोधात असते हे पाहून तिची आई तिला सांगते कि, तुझे बाबा रात्रीपासून शेतात आहेत, मुलगी धावतच शेतात जाते आणि वडिलांना सर्व काही सांगते! खुशीचे वडील प्रेमाने मुलीला आपल्या मांडीवर उचलून घेतात आणि म्हणतात की 'यावेळी शेतातील पीक खूप चांगले आले आहे, तुमच्या मॅडमला सांगा की पुढच्या आठवड्यात सर्व फीस देऊन टाकू'. आपण जत्रेत पण जाऊत का? खुशी विचारते. होय, आपण जत्रेत जाऊन पकोडे आणि बर्फी खाऊ, असे खुशीचे वडील तिला सांगतात.
हे ऐकून खुशी नाचायला लागते आणि घरी येताना वाटेत तिच्या मैत्रिणींना सांगते की, 'मी आई वडिलांसोबत जत्रा बघायला जाणार आहे आणि जत्रेत पकोडे आणि बर्फी खाणार आहे'. हे ऐकून शेजारी उभी असलेली एक म्हातारी म्हणते, बेटा, माझ्यासाठी जत्रेतून काही आणशील का?
हो आजी 'आमचं पीक खूप चांगलं आलय, मी तुमच्यासाठी नवीन कपडे आणते. म्हणत खुशी घराकडे धावली'!
दुसऱ्या दिवशी सकाळी खुशी शाळेत जाते आणि तिच्या मॅडमला सांगते की, 'यावेळी आमचे पीक खूप चांगले आले आहे, पुढच्या आठवड्यात सर्व पीक विकले जाईल आणि वडील येऊन सर्व फी भरतील'. त्यावर प्रिन्सिपल खुशीला कठोर शब्दात सांगतात कि, 'गप्प बस, वर्षभर तुमचा हाच बहाणा असतो बस खाली'. खुशी शांतपणे वर्गात बसते आणि जत्रेत जाण्याचे स्वप्न पाहू लागते. त्याच दिवशी चार वाजता जोराचा वारा सुटतो आणि पाऊस, गारा पडू लागतात. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट सुरू होतो, मोठं-मोठी झाडे भुईसपाट होतात.
हे सर्व निसर्गाचा प्रकोप पाहून, खुशीच्या डोळ्यात अश्रू येऊ लागतात, तिला तीच भीती पुन्हा सतावू लागते, सर्व काही संपण्याची भीती, पीकाची नासधूस होण्याची भीती, फी भरता न येण्याची भीती, शाळा संपल्यानंतर ती हळूहळू घराकडे जाऊ लागली. घरी गेल्यावर तिच्या वडिलांचे बोलणे ऐकून त्या चिमुकलीने रंगवलेला सर्व स्वप्न धुळीस मिळाली. त्यांच्या शेतातील सर्व पीक हे अवकाळी पाऊस घेऊन गेला होता. आणि खुशी रोज शाळेतील फीस न भरल्यामुळे शिक्षकांचे टोमणे ऐकत होती. ख़ुशीचे जत्रेत जाण्याचे स्वप्न याही वर्षी पूर्ण झालं नाही.
"लहान शेतकरी आणि मजुरांच्या कुटुंबातील वेदना समजून घेण्यात संपूर्ण आयुष्य गेले तरी हि आपल्याला त्यांची खरी वेदना समजू शकणार नाही".