Janmarathi

Heartbreak Insurance Fund: प्रेमीयुगुलांसाठी आला हार्टब्रेक इन्शुरन्स फंड, प्रेमात फसवलेल्यांना मिळणार २५ हजार रुपये........

Heartbreak Insurance Fund: प्रेमीयुगुलांसाठी आला हार्टब्रेक इन्शुरन्स फंड, प्रेमात फसवलेल्यांना मिळणार २५ हजार रुपये........
X

Heartbreak Insurance Fund: प्रेमीयुगुलांसाठी आला हार्टब्रेक इन्शुरन्स फंड, प्रेमात फसवलेल्यांना मिळणार २५ हजार रुपये........

आरोग्य आणि जीवनासोबतच मौल्यवान वस्तूंच्या इन्शुरन्स बदल तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण प्रेमात धोका दिल्या बदलचे इन्शुरन्स या बाबतीत तुम्ही कधी ऐकले आहे का? विशेषत: हि योजना अशा लोकांसाठी आहे, ज्यांची प्रेमात फसवणूक होते.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये हार्टब्रेक इन्शुरन्स फंडाविषयी सांगण्यात आले आहे, जो प्रेमात फसवणूक झालेल्यांना पैसे देतो. त्याखाली एका यूजरने लिहिले की, माझ्या मैत्रिणीने माझी फसवणूक केली, त्यामुळे मला २५ हजार रुपये मिळाले. आम्ही दोघांनी आमच्या नात्याच्या सुरुवातीलाच ठरवलं होतं की, आम्ही दोघे दरमहा ५००-५०० रुपये गोळा करू आणि जेव्हा दोघांपैकी कोणी फसवणूक करेल तेव्हा गोळा केलेले पैसे आणि इन्शुरन्सचे पैसे त्याला मिळतील.

ज्या युजरने ट्विट केले आहे, त्याचे नाव प्रतीक आर्यन आहे. ज्याने आपल्या मैत्रिणीसोबत ही योजना बनवली आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अशाप्रकारे हार्टब्रेक इन्शुरन्स फंड प्रचंड व्हायरल होत आहे. या अनोख्या योजनेबद्दल तुमचे काय म्हणणे आहे, ते तुम्ही नक्की सांगा. विशेष म्हणजे तुटलेल्या मनाच्या लोकांना प्रेम नाही तर पैसे मिळावेत यासाठी हा विमा निधी योग्य प्रकारे राबवण्याची मागणी अनेक वापरकर्ते करत आहेत.

Next Story