Internet Addiction: मेंदूवर मादक पदार्थाप्रमाणे परिणाम करत आहे ऑनलाइन गेम......!

Internet Addiction: मेंदूवर मादक पदार्थाप्रमाणे परिणाम करत आहे ऑनलाइन गेम......!
इंटरनेटचा विकार तरुणांना आपल्या कवेत घेत आहे. रुग्णालयातील मनोरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या अशा तरुणांची संख्या वाढत आहे. इंटरनेट डिसऑर्डरचा परिणाम ड्रग्जप्रमाणेच तरुणांवर होत आहे. एका संशोधनात असे दिसून आले आहे की, इंटरनेट डिसऑर्डरमुळे मेंदूमध्ये अल्कोहोल किंवा ड्रग्स घेतल्याने होतात तसे बदल होत आहेत. इंटरनेटच्या व्यसनामुळे मेंदूच्या त्याच भागावर परिणाम होतो, जो ड्रग्ज आणि अल्कोहोलमुळे प्रभावित होतो. हा बदल जाणून घेण्यासाठी काही तरुणांची फंक्शनल एमआरआय टेस्ट करण्यात आली. केजीएमयूच्या मानसोपचार विभागामध्ये दररोज या विकाराचे ५ ते ६ रुग्ण पोहोचत आहेत. कोरोनानंतर अशा रुग्णांची संख्या झपाटयाने वाढली आहे.
• आठवड्यातून ४० ते ८० तास इंटरनेट वापराचे व्यसन.......
केजीएमयूचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ.पवन गुप्ता यांच्या मते, तरुणांमध्ये इंटरनेट व्यसनाचे अनेक प्रकार दिसून आले आहेत. यामध्ये ऑनलाइन गेमिंग, शॉपिंग, पॉर्न, लैंगिक चॅट, सोशल मीडिया इत्यादी प्रमुख आहेत. जे ४० ते ८० तास इंटरनेट वापरतात ते या व्यसनाच्या विळख्यात आहेत.
• दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम...........
इंटरनेटच्या व्यसनाने त्रस्त तरुणांच्या एमआरआय फंक्शनमध्ये असे आढळून आले की, मेंदूच्या स्ट्रायटल न्यूक्लियर डोपामिनर्जिक प्रणालीवर परिणाम होतो. ही प्रणाली डोपामाइन संप्रेरक सोडते, जे एखाद्या व्यक्तीच्या मूडवर नियंत्रण ठेवते. यामुळे तेच काम पुन्हा पुन्हा करावेसे वाटते. दैनंदिन जीवनशैली वर याचा परिणाम होत आहे.
• इंटरनेट व्यसन कसे ओळखावे.........
गुगलवर देखील इंटरनेट डिसऑर्डर टेस्ट करता येते. यामध्ये अनेक प्रश्न विचारले जातात, ज्याच्या आधारे इंटरनेट व्यसन जडले आहे का नाही हे ठरवले जाते.
• जर लहान मूल किंवा तरुण दिवसभर मोबाईलमध्ये व्यस्त असेल तर होणारे परिणाम...........
बोलताना चिडचिड होणे, एकाग्रता गमावणे, अभ्यासात रस न राहणे, उशीरा उठणे, नेहमीच आळश येणे असे बदल दिसून येतात.
• उपचार काय आहे......
समुपदेशन, मित्र आणि कुटुंबासह अधिक वेळ घालवणे, विनाकारण मोबाईल-टॅब वापरू नका, गंभीर परिस्थितीत रुग्णांना हॉस्पिटल मध्ये दाखल करावे, गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेणे.