Janmarathi

कोलकत्ता येथील इमारतीला भीषण आग पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्याकडून सदभावना व्यक्त

13 व्या मजल्यावर लागलेल्या या आगीत मृत्यूपावलेल्यांच्या कुटुंबीयांना व जखमींना पंतप्रधानांकडून निधी जाहीर. ममता बॅनर्जी झाल्या घटनास्थळी दाखल.

कोलकत्ता येथील इमारतीला भीषण आग पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्याकडून सदभावना व्यक्त
X

कोलकाता पश्चिम बंगालच्या राजधानी असलेल्या शहरातील, बडा बाजार स्ट्रेंड रोड, येथे सांधायकली ६ छाया सुमारास एका बहुमजली इमारतीच्या १३ व्या मजल्यावर आग लागली. त्यात 9जणांचा मृत्यू झाला आहे यापैकी ४ अग्निशमन दलाचे जवान आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी कणिशमन दलाने लगेचच धाव घेत इमारत रिकामी केली. हि माहीत अग्निशमन दलाचे अधिकारी सुजित बोस यांनी पत्रकारांना दिली. यावेळी स्ट्रेंड मार्गावरील वाहतूक पोलिसांनी रोखली होती. रात्री ११ वाजताच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील घटनास्थळी रात्री उशिरा दाखल झाल्या होत्या. घतेणेंचि माहिती घेऊन बचावकार्या जलद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पीडितांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदतीची घोषणा देखील केली आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात येईल असेही सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल रिलीफ फंडातून २ लाख पिडितांच्या कुटुंबाला तर ५०००० गंभीर जखमींना देण्याचे जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी पीडितांसाठी व कुटुंबियांसाठी साधभावना व्यक्त केल्या. तसेच राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांनी देखी दुःख व्यक्त करत कुटुंबियांसाठी सद्भावना व्यक्त केल्या आहेत.

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या घटनेबाबत उच्च चौकशीचे आदेशही दिले आहेत. तसेच आम्ही पीडितांच्या दुःखात सहभागी आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Next Story