Janmarathi

मध्य प्रदेश : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला 1 लाख रुपयांची मदत

Madhya Pradesh Chief Minister Shivrajsingh Chauhan declared aid of Rs 1 lakh to the family members of covid deceased citizens

मध्य प्रदेश : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला 1 लाख रुपयांची मदत
X

भोपाळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात अक्षरश: थैमान घातलंय. या काळात अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले. काहिंच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेला. अशावेळी दिल्लीतील केजरीवाल सरकार पाठोपाठ आणि मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारनेही मोठा निर्णय घेतलाय.

कोरोना काळात ज्या कुटुंबाने आपल्या घरातील सदस्य गमावला, अशा कुटुंबाला सरकारकडून 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलीय. चौहान यांच्या या घोषणेमुळे कोरोना काळात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना काहिसा आधार मिळणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मध्य प्रदेशातही थैमान घातलं आहे. मध्य प्रदेशात आतापर्यंत 7 हजार पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय. त्या सर्वांच्या कुटुंबियांना मध्य प्रदेश सरकार 1 लाख रुपयांची मदत करणार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी संध्याकाळी ही घोषणा केली आहे.

Shrinivas Varunjikar

Shrinivas Varunjikar

जन्म पुणे येथे; शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथे. विज्ञान पदवीधर. मराठी साहित्यात आजवर एकूण सात पुस्तके प्रकाशित, तीन प्रकाशनाच्या मार्गावर. विविध संस्थांशी संपर्क. वर्ष 1989 ते वर्ष 2005 फार्मास्युटीकल सेलींगमधील अनुभव. त्यानंतर लोकमत टाइम्स औरंगाबाद, साप्ताहिक इंटेलिजंट पुणे (दै. प्रभातचे इंग्लिश साप्ताहिक) येथे उपसंपादक. वर्ष 2011 पासून मराठी प्रभातमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निवडणुकीतील वर्ष 2016 चे उमेदवार, जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे चार वर्षे वार्तांकन, 200 हून अधिक सेलिब्रीटीजच्या मुलाखती, आकाशवाणी पुणे-सातारा-कोल्हापूरसाठी किमान 175 कार्यक्रम सादर, लघुपटांसाठी संहिता लेखन, लघुपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही कार्यरत. अनुवादक, कवी, सूत्रसंचालक आणि पत्रकार अशी ओळख. राज्य शासनाच्या कवी बा. सी. मर्ढेकर स्मारक समितीवर सदस्य.


Next Story