Janmarathi

सुदान संकटावर मोदी सरकारची कारवाई, जाणून घ्या भारत सरकारने राबवलेले सात मोठे एअरलिफ्ट ऑपरेशन्स......!

सुदान संकटावर मोदी सरकारची कारवाई, जाणून घ्या भारत सरकारने राबवलेले सात मोठे एअरलिफ्ट ऑपरेशन्स......!
X

सुदान संकटावर मोदी सरकारची कारवाई, जाणून घ्या भारत सरकारने राबवलेले सात मोठे एअरलिफ्ट ऑपरेशन्स......!

सुदानमधील परिस्थिती दिवसोंदिवस खराब होत चालली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. सुदानमध्ये अडकलेल्या ३,००० हून अधिक भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना तातडीने योजना तयार करण्यास सांगितले आहे. ही योजना एअरलिफ्ट देखील असू शकते. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचाही समावेश होता. त्यांनी सरकारला सुदानमधील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. चिंता व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि सर्व भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचे मूल्यांकन करण्याचे निर्देश दिले आहेत. परिस्थिती बिघडल्यास आकस्मिक नियोजनासाठी सतर्क राहण्याचे त्यांनी सांगितले आहे. भारताने या आधी ही बऱ्याच वेळा इतर देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना अशा परिस्थितीत एअरलिफ्ट करून त्यांचे प्राण वाचवले आहेत.

१.ऑपरेशन गंगा: २०२२ मध्ये रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीवसह प्रमुख शहरावर आक्रमण केले तेव्हां तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने 'ऑपरेशन गंगा' सुरू केले होते. या उपक्रमांतर्गत १८,००० हून अधिक अडकलेल्या भारतीयांना विशेष विमानांद्वारे युक्रेनमधून बाहेर काढण्यात आले. 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रोमानिया, पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि मोल्दोव्हा येथे ७६ उड्डाणे पाठवण्यात आली.

२.ऑपरेशन राहत: २०१५ मध्ये येमेनमध्ये सरकार आणि हुथी बंडखोरांमध्ये संघर्ष झाला होता. संघर्षादरम्यान येमेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय आणि शेकडो परदेशी नागरिकांना वाचवण्यासाठी सरकारने एअर लिफ्ट ऑपरेशन सुरू केले. ज्याला 'ऑपरेशन राहत' असे नाव देण्यात आले होते. विशेष उड्डाणे आणि भारतीय नौदलाच्या जहाजांद्वारे सुमारे ४,००० भारतीयांना बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे युद्धग्रस्त येमेनमधून भारतीयांसोबत इतर २६ देशांतील परदेशी नागरिकांनाही बाहेर काढण्यात आले होते. भारताच्या या मोहिमेने अमेरिकाही प्रभावित झाली होती. अमेरिकन दूतावासाने अमेरिकन नागरिकांना येमेनची राजधानी साना सोडण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांची मदत घेण्याचा सल्ला दिला होता.

३.ऑपरेशन सेफ होमकमिंग: लिबियातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी २०११ मध्ये ही कारवाई सुरू करण्यात आली होती. तत्कालीन हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी विरुद्ध गृहयुद्ध पेटले होते. लिबियातील त्रिपोली, इजिप्तमधील अलेक्झांड्रिया आणि माल्टा येथून १५,४०० हून अधिक भारतीय नागरिकांना विशेष विमानाने बाहेर काढण्यात आले. भारतीय नौदलाच्या मदतीने लोकांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले होते.

४.ऑपरेशन आराम: २००६ मध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला या लेबनीज अतिरेकी गटामध्ये युद्ध झाले. त्यानंतर भारतीय नौदलाने 'ऑपरेशन सकून' चालवले होते. माहितीनुसार, भारतीय नौदलाने युद्धग्रस्त भागातून १,७६४ भारतीय, ११२ श्रीलंकन, ६४ नेपाळी आणि ७ लेबनीज यांच्यासह २,२८० लोकांनचे प्राण वाचवले होते.

५.ऑपरेशन कुवेत: ही गोष्ट आहे १९९० सालची, आखाती युद्धाच्या काळात भारतीयांना मोठ्या प्रमाणावर विमानातून बाहेर काढण्यात आले होते. हवाई दलाच्या जवानांनी सुमारे दोन लाख नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले होते. ही मोहीम दोन महिने चालली. आतापर्यंत हाती घेतलेल्या सर्वात मोठ्या एअर लिफ्ट मिशनसाठी एअर इंडियाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

६.ऑपरेशन गंगा: याशिवाय २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात जगातील अनेक देशांमध्ये अडकलेल्या ६० लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढण्यात आले होते.

७.ऑपरेशन मैत्री: २०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांनी तेथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन मैत्री' राबवले होते.

Next Story