Janmarathi

Nanded Video: 'लग्नात जास्त नाचू नका रे' लग्नात डान्स करत असताना युवकाचा मृत्यू....पाहा व्हिडिओ !

Nanded Video: लग्नात जास्त नाचू नका रे लग्नात डान्स करत असताना युवकाचा मृत्यू....पाहा व्हिडिओ !
X

Nanded Video: 'लग्नात जास्त नाचू नका रे' लग्नात डान्स करत असताना युवकाचा मृत्यू....पाहा व्हिडिओ !

गेल्या काही दिवसा पासून जिम मध्ये व्यायाम करत असताना, जेवण करत असताना, किंवा इतर काही कामे करत असताना झालेल्या मृत्यूचे व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर वायरल होत आहेत. अशाच एक घटनेत महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील युवकाचा तेलंगणात लग्नात नाचत असताना मृत्यू झाला आहे.

तेलंगणा राज्यात आपल्या नातेवाईकांच्या लग्नाला गेलेला युवक डिजेच्या तालावर नाचत असताना तो अचानक खाली तोंडावर पडला आणि नंतर उठलाच नाही. युवक खाली पडल्यावर डीजे बंद करून नातेवाईक युवकाला उठवण्याचा प्रयत्न करतात पण युवक काहीच हालचाल करत नसल्यामुळे नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात घेऊन गेले,पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील शिवणी या गावातील रहिवाशी मुतना जामगेवाड हे तेलंगणा राज्यातील पारडी या गावातील आपल्या नातेवाईकाच्या लग्नाला आला होता. शनिवारी रात्री मुतना उशिरा तेलगू चित्रपटाच्या गाण्यावर नाचत होता. नाचता-नाचता तो अचानक थांबला आणि खाली पडला, आजूबाजूच्या नातेवाईकांना वाटले कि, तो डान्स मूव्ह करतोय पण थोड्यावेळ झाला तरी तो उठला नाही. हे बघून एक नातेवाईक त्याच्या जवळ जाऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो पण युवक बेशुद् अवस्थेत होता. युवक काहीच हालचाल करत नव्हता हे बघून नातेवाईकानी त्याला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Next Story
Share it