Janmarathi

ऑस्कर २०२३ च्या मंचावर गाढवाने लुटली प्रसिद्धी......पाहा व्हिडिओ !

ऑस्कर २०२३ च्या मंचावर गाढवाने लुटली प्रसिद्धी......पाहा व्हिडिओ !
X

ऑस्कर २०२३ च्या मंचावर गाढवाने लुटली प्रसिद्धी......पाहा व्हिडिओ !

ऑस्कर अवॉर्ड्स २०२३ चा भव्य कार्यक्रम संपला झाला आहे. चांगली गोष्ट म्हणजे हा संपूर्ण सोहळा अतिशय आनंदात आणि शांततेत पार पडला आणि कोणताही वाद झाला नाही. अमेरिकेतील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित या सोहळ्यात एकीकडे जगभरातील नामवंतांची झुंबड उडाली होती, तर दुसरीकडे गाढव आणि अस्वल यांनी प्रसिद्धी लुटली. स्टेजवर गाढव आणि अस्वल पाहून समारंभात उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.

वास्तविक, गाढवाची एंट्री ऑस्करच्या मंचावर पूर्ण सन्मानाने झाली. कार्यक्रमाच्या स्टेजवर गाढव पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मात्र, आता गाढवाला स्टेजवर घेऊन येण्याचे काय कारण, हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचे होते. या गाढवाची कथा जेमीच्या 'द बंशीज ऑफ इनिशरीन' चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील सर्वांचे लक्ष गाढवाकडे वेधण्यासाठी कार्यक्रमाच्या सूत्रधाराने इतर कलाकारांप्रमाणेच त्याला पूर्ण सन्मानाने मंचावर आणले.

गाढवाने स्टेजवर प्रवेश करताच तिथे बसलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात पूर्ण आदराने आणि उत्साहात त्याचे स्वागत केले. मात्र, यावेळी लोकांच्या चेहऱ्यावर हसूही पाहायला मिळाले. ऑस्कर सोहळ्यात असं काही पहिल्यांदाच पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या भव्य कार्यक्रमात गाढवाशिवाय अस्वलानेही दमदार पदार्पण केले होते. येथील अस्वलाने 'कोकेन बेअर' या चित्रपटाचे प्रतिनिधित्व केले होते. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका एलिझाबेथ बँक्सच्या मंचावर अस्वलाची एंट्री झाली. मात्र, आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे अर्थातच गाढव खरा असला, तरी अस्वलाच्या वेषात माणूस होता.

हा ऑस्कर भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक महत्वपूर्ण क्षण ठरला आहे. एकीकडे एस.एस. राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील नातू-नातू या गाण्याला मूळ गाण्यासाठी पुरस्कार देण्यात आला. त्याचवेळी 'द एलिफंट व्हिस्पर्स' या माहितीपटालाही ऑस्कर पुरस्कार मिळाला.

Next Story