नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी.......पाहा त्यांच्या काही खास फोटो !

नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी.......पाहा त्यांच्या काही खास फोटो !
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमला भेट दिली. अमित शाह यांचा मुलगा आणि BCCI सचिव जय शाह यांनी नरेंद्र मोदींचा फोटो देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे देखील उपस्थित होते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज पहिल्या दिवसाचा खेळ पाहणार आहेत. सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी आपापल्या क्रिकेट संघाच्या कर्णधाराचा गौरव केला आणि या खास कसोटी सामन्यासाठी खेळाडूंना कॅप दिली.
यानंतर दोन्ही नेत्यांनी खास वाहनातून स्टेडियमचा फेरफटका मारला. यावेळी स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले होते. राष्ट्रगीतादरम्यान दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी आपापल्या संघातील खेळाडूंसोबत राष्ट्रगान केले. सध्या दोन्ही देशाचे पंतप्रधान स्टेडियममधून सामना पाहत आहेत.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत खाजगी संवाद साधतानाही दिसले. तसेच भारतीय संघातील सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन केले.