Janmarathi

Rohit Sharma Net Worth 2023: 'हिट मॅन' म्हणून ओळख असलेल्या रोहित शर्माची एकूण संपत्ती किती आहे ते जाणून घ्या.......!

Rohit Sharma Net Worth 2023: भारतीय क्रिकेट संघाचा हिट मॅन म्हणून ओळख असलेल्या रोहित शर्माची एकूण संपत्ती किती आहे ते जाणून घ्या.......!
X

Rohit Sharma Net Worth 2023: भारतीय क्रिकेट संघाचा हिट मॅन म्हणून ओळख असलेल्या रोहित शर्माची एकूण संपत्ती किती आहे ते जाणून घ्या.......!

भारतात क्रिकेटचे लोकांना खूप वेड आहे. चाहते, खेळ आणि खेळाडूंचे वेडे आहेत. भारताने अलीकडच्या काळात मिळवलेल्या मोठ्या विजयामागे रोहित शर्माचे खूप मोठे योगदान आहे. रोहित शर्मा त्याच्या क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो आणि त्याला चाहते “हिटमॅन” म्हणून ओळखतात. रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज आहे.

येथे आपण भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून त्याची कारकीर्द, त्याचे यश आणि रेकॉर्ड, व्यवसाय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची कमाई आणि एकूण संपत्ती हे जाणून घेणार आहोत.......

रोहित शर्माने उजव्या हाताचा फलंदाज म्हणून २३ जून २००७ रोजी आयर्लंड विरुद्ध क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि तो सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे.

रोहित शर्मा, मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्येंत पाच वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याच्या विक्रमांचा विचार करता, रोहितने खेळाडू म्हणून आणि जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून रँकिंगच्या बाबतीत अव्वल स्थान मिळवले होते. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला २०२३ च्या लिलावात १६ कोटी रुपयाला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

रोहित शर्माची एकूण निव्वळ संपत्ती २६ दशलक्ष डॉलर (रु.२१४ कोटी ) आहे. त्याची बहुतेक उत्पन्न आणि निव्वळ संपत्ती क्रिकेटमधून आणि ब्रँड्स जाहिराती मधून आली आहे. रोहित शर्मा, विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमधून आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून खूप मोठी रक्कम कमावतो. रोहित शर्माचे मासिक उत्पन्न आणि पगार १.२ कोटी रुपये आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न १६ कोटी रुपये आहे.

रोहित शर्माने #CoronavirusOutbreak लढण्यासाठी ८० लाख रुपयांची देणगी दिली आहे.त्याने एका मुलाखतीत सांगितले होते कि, "आपल्याला आपला देश पुन्हा पायावर उभा करण्याची गरज आहे आणि जबाबदारी आपल्यावर आहे. मी #PMCaresFunds ला ४५ लाख, #CMReliefFund महाराष्ट्राला २५ लाख, @FeedingIndia ला ५ लाख देणगी देण्याचे काम केले आहे आणि #WelfareOfStrayDogs ला ५ लाख रुपये दिले आहेत. चला आपल्या नेत्यांच्या मागे राहून त्यांना पाठिंबा द्या".

रोहित शर्माची माघील ५ वर्षाची नेट वर्थ........

२०२३ मध्ये नेट वर्थ रु. २१४ कोटी रूपये, २०२२ मध्ये नेट वर्थ रु. १९५ कोटी रूपये, २०२१ मध्ये नेट वर्थ रु. १७० कोटी रूपये, २०२० मध्ये नेट वर्थ रु. १५५ कोटी रूपये, २०१९ मध्ये नेट वर्थ रु. १४२ कोटी रूपये, २०१८ मध्ये नेट वर्थ रु. १३६ कोटी रूपये, २०१७ मध्ये नेट वर्थ रु. १२० कोटी रूपये. रोहित शर्माची निव्वळ संपत्ती गेल्या वर्षांमध्ये २६% वाढली आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.

रोहित शर्माचे मुंबई येथे एक आलिशान डिझायनर घर आहे, जे त्याने २०१५ मध्ये विकत घेतले होते. त्याच्या घराची सध्याची किंमत रु. ३० कोटी रूपये आहे. तसेच, त्याच्याकडे देशभरात अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत.

रोहित शर्माकडे जगातील काही सर्वोत्तम आलिशान कार आहेत. रोहित शर्माच्या मालकीच्या कार ब्रँडमध्ये BMW, Audi, Porsche आणि Mercedes Benz यांचा समावेश आहे.

Next Story