Satish Kaushik: 'चला गया कॅलेन्डर' प्रसिद्द बॉलीवूड अभिनेता सतीश कौशिक यांच निधन.......!

Satish Kaushik: 'चला गया कॅलेन्डर' प्रसिद्द बॉलीवूड अभिनेता सतीश कौशिक यांच निधन.......!
बॉलिवूड जगतातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झाल आहे. सतीश कौशिक हे ६७ वर्षाचे होते. सतीश कौशिक हे बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध कॉमेडीयन अभिनयासाठी प्रसिद्ध होते. आज सकाळी त्यांचे निधन झाल.
आज सकाळी अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट्सवर ट्विट करून माहिती दिली. अनुपम खेर यांनी या ट्विट मध्ये दुःखद भावना व्यक्त केल्या आहेत. 'जानता हूँ' “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था। ४५ साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH! ओम् शांति!
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔 pic.twitter.com/WC5Yutwvqc
— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023
अभिनयासह सतीश कौशिक यांनी दिग्दर्शन आणि चित्रपटा निर्माता म्हणून देखील बॉलिवूडमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. कौशिक यांनी मिस्टर इंडियामध्ये केलेली कॅलेंडरची भूमिका अजरामर आहे. त्यासोबतच सलमान खानच्या तेरे नाम या सुपरहिट बॉलीवूड चित्रपटाचे सतीश कौशिक यांनी दिग्दर्शन केले होते.
अभिनेता, कॉमेडीयन, स्क्रिप्ट रायटर, निर्माता, आणि दिग्दर्शक म्हणून काम केलेले सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९६५ साली हरियाणा मध्ये झाला होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे दिल्ली येथे झाले आहे. सतीश कौशिक यांनी पुणे येथील प्रसिद्द 'फिल्म अँड टेलेविज़न ऑफ़ इंडिया' मधून एक्टिंग चे शिक्षण घेतले होते.
चित्रपट हास्य अभिनेता म्हणून सतीश कौशिक यांना १९८७ साली आलेल्या 'मिस्टर इंडिया' या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. त्यांनी दिवाना मस्ताना या चित्रपटात केलेली पपू पजेर ची भूमिका लोकांना खूप आवडली होती.
सतीश कौशिक यांना १९९० मध्ये राम-लखन आणि १९९७ मध्ये साजन चले ससुरलं या चित्रपट केलेल्या हास्य भूमिके बदल सर्वउत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्म फेयर पुरस्कार मिळाला होता. सतीश कौशिक यांनी रूप कि राणी चोरो का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते है, तेरे नाम, सारख्या चित्रपटांचं निर्देशन म्हणून काम केलं आहे.