Janmarathi

Shocking Video: मोबाईल दिला नाही म्हणून मुलाने १७ व्या मजल्याहून मारली उडी..........!

Shocking Video: मोबाईल दिला नाही म्हणून मुलाने १७ व्या मजल्याहून मारली उडी..........!
X

Shocking Video: मोबाईल दिला नाही म्हणून मुलाने १७ व्या मजल्याहून मारली उडी..........!

आजकाल मोबाईल हा लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. फोन बाजूला ठेवून जर मुलांनी अभ्यास केला, तर अशी वेळ येणार नाही. हे उघड आहे. पण सध्या सगळीच मुलं एवढी हट्टी झाली आहेत की, ते स्वतःचा हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. कधी-कधी तर या आशा प्रकारामुळे त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. याच उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे. ज्यात वडिलांनी मोबाईल आणि आयपॅड मुलाकडून काढून घेतला. तेव्हा मुलाला वडिलांचा इतका राग आला की त्याने १७ व्या मजल्यावरून उडी मारण्याची भीती आई-वडिलांना दाखवली आणि मग अचानक त्याचा हात सुटला आणि तो खाली पडला. हा व्हिडिओ सिंगापूरचा आहे.

या व्हिडिओ मध्ये असे दिसत आहे कि, त्याचा मोबाईल आणि आयपॅड परत न केल्यास तो उडी मारून जीव देईल, अशी धमकी त्याच्या आई-वडिलांना देतो. सुदैवाने पालकानी सावधगिरी बाळगली. त्यांनी तत्काळ फोन करून अग्निशमन दलाला कळविले. काही मिनिटांतच त्याला वाचवण्याची व्यवस्था करण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने जमिनीवर गादी बसवल्याचं बघायला मिळतं. तेवढ्यात मुलाचा हात सुटला आणि तो १७व्या मजल्यावरून जमिनीवर पडला. कदाचित त्याचा मृत्यू होईल असं वाटत होतं. मात्र खाली अग्निशमन दलाचं पथक सतर्क होतं. त्यामुळे तो वाचला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.

हा व्हिडिओ आतापर्यंत ६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक केल आहे आणि अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. हे काही पहिलं प्रकरण नाही. याआधी अमेरिकेतील ओहियो राज्यतील एका १६ वर्षीय मुलीने आपल्या वडिलांना धडा शिकवण्यासाठी अनोखं पाऊल उचललं होतं. खरं तर, मुलगी दिवसभर फोनमध्ये बिजी असायची, म्हणून वडिलांनी तिचा आयफोन घेतला. यामुळेच मुलीने ९११ वर वडिलांची तक्रार करण्यासाठी पोलिसांना फोन केला आणि लगेच पोलिसही घरी पोहोचले. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील अजमेरमधून बातमी आली होती की, वडिलांनी मुलीकडून मोबाईल परत घेतला त्यामुळे तिने आत्महत्या केली. ही मुलगी अकरावी वाणिज्य शाखेत शिकत होती. मोबाईल परत घेतल्याने ती नैराश्यात होती.

Next Story