Janmarathi

अनिल देशमुखांवरील FIR : 'दोन परिच्छेद वगळण्याची मागणी

In Sachin Vaze case, the state government urged court to delete two paragraphs from the filed FIR against former home minister Anil Deshmukh

अनिल देशमुखांवरील FIR : दोन परिच्छेद वगळण्याची मागणी
X

मुंबई : सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्हा प्रकरणात याचिकेवर सुनावणी झाली. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातील दोन परिच्छेद वगळण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठीच सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल केला, असं राज्य सरकारचं याचिकेत म्हणणं आहे. सीबीआयने मात्र तपासात कुठल्याही मुद्द्यांचा समावेश करता येऊ शकतो, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

सचिन वाझेला पोलीस दलात घेण्यामागे आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हस्तक्षेप होता, असं सीबीआयने त्यांच्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. हे दोन मुद्दे गुन्ह्यातून वगळावेत, यासाठी राज्य सरकारने याचिका केली होती. हे दोन्ही मुद्दे हे मंत्रालयीन आणि प्रशासकीय कामाचे भाग आहेत.

त्यामुळे गुन्ह्यात यांचा समावेश करुन सीबीआय मुद्दाम चौकशी करु पाहत आहे, असं राज्य सरकारने याचिकेत म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठीच सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल केला, असं राज्य सरकारचं याचिकेत म्हणणं आहे.

दरम्यान, काही राज्यात सीबीआय परवानगीशिवाय तपास करु शकत नाही, याची आम्हाला कल्पना आहे. पण दुर्मिळ प्रकरणात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआय तपास करु शकतं, असं सीबीआयने कोर्टात सांगितलं.

वकील जयश्री पाटील यांच्या तक्रारीनुसारच तपास सुरु असल्याचं सीबीआयने स्पष्ट केलं. तपासात कुठल्याही मुद्द्यांचा समावेश करता येऊ शकतो, असं स्पष्टीकरण सीबीआयने दिलं आहे. शुक्रवारी 3 वाजता पुढील सुनावणी होणार आहे.

Shrinivas Varunjikar

Shrinivas Varunjikar

जन्म पुणे येथे; शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथे. विज्ञान पदवीधर. मराठी साहित्यात आजवर एकूण सात पुस्तके प्रकाशित, तीन प्रकाशनाच्या मार्गावर. विविध संस्थांशी संपर्क. वर्ष 1989 ते वर्ष 2005 फार्मास्युटीकल सेलींगमधील अनुभव. त्यानंतर लोकमत टाइम्स औरंगाबाद, साप्ताहिक इंटेलिजंट पुणे (दै. प्रभातचे इंग्लिश साप्ताहिक) येथे उपसंपादक. वर्ष 2011 पासून मराठी प्रभातमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निवडणुकीतील वर्ष 2016 चे उमेदवार, जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे चार वर्षे वार्तांकन, 200 हून अधिक सेलिब्रीटीजच्या मुलाखती, आकाशवाणी पुणे-सातारा-कोल्हापूरसाठी किमान 175 कार्यक्रम सादर, लघुपटांसाठी संहिता लेखन, लघुपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही कार्यरत. अनुवादक, कवी, सूत्रसंचालक आणि पत्रकार अशी ओळख. राज्य शासनाच्या कवी बा. सी. मर्ढेकर स्मारक समितीवर सदस्य.


Next Story