Sukanya 2023: सुकन्या समृद्धी योजने विषयी नवीन सविस्तर माहिती २०२३........!

Sukanya 2023: सुकन्या समृद्धी योजने विषयी नवीन सविस्तर माहिती २०२३........!
सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची एक बचत योजना आहे. ही योजना पालकांना त्यांच्या मुलींच्या भविष्यातील शिक्षण, लग्न यासाठी निधी तयार करण्यास प्रोत्साहित करते. बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून २२ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना पानिपत, हरियाणा येथून सुरू केली. सुकन्या समृद्धी खाती कोणत्याही भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये किंवा काही अधिकृत व्यावसायिक बँकांच्या शाखेत उघडली जाऊ शकतात. या योजने अंतर्गत सुरुवातीला, व्याज दर ९.१% ठेवण्यात आला होता, परंतु मार्च २०१५ च्या अखेरीस २०१५-१६ साठी व्याज दर ९.२% करण्यात आला. चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी व्याजदर ७.६% करण्यात आला आहे.
मुलीच्या जन्मा पासून ते मुलीला १० वर्षे पूर्ण होईपर्यंत हे सुकन्या समृद्धी खाते उघडता येते. प्रत्येक मुलीसाठी तिच्या नावे फक्त एक खाते उघडण्याची परवानगी आहे. पालक त्यांच्या जास्तीत जास्त दोन मुलीच्या नावे ही खाती उघडू शकतात. हे खाते भारतात कुठेही उघडले जाऊ शकते. जुळ्या किंवा तिप्पट जन्मलेल्या मुलीच्या बाबतीत पालक दोन किवां तीन खाती उघडू शकतात. खाते उघडण्याच्या वेळी खातेदार भारतीय नागरिक आणि भारतातील रहिवासी असणे आवश्यक आहे आणि मॅच्युरिटी किंवा खाते बंद होईपर्यंत भारतीय रहिवाशी राहणे आवश्यक आहे.
खात्यात सुरुवातीला कमीत-कमी २५० रुपये जमा करणे आवश्यक आहे. या खात्यात वर्षा काठी जास्तीत-जास्त १५०,००० रुपये रक्कम भरण्याची मर्यादा आहे. मुलीच्या उच्च शिक्षणाच्या उद्देशाने तिच्या वयाच्या १८ व्या वर्षी खात्यातील ५०% पैसे काढण्याची परवानगी आहे. खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षांच्या कालावधीनंतरच त्या खात्याची मॅच्युरिटी होते. खाते उघडल्याच्या तारखेपासून १५ वर्षे पूर्ण होईपर्यंत खात्यात ठेवी ठेवता येतात.
परंतु, खातेदाराने, खातेदाराच्या विवाहाच्या कारणास्तव किवां तिच्या शिक्षणाच्या कारणास्तव मुदतीपूर्वी बंद करण्याची विनंती केल्यास, एकवीस वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. विवाहाच्या तारखेला अर्जदाराचे वय अठरा वर्षांहून कमी नसल्याची पुष्टी करणारा वयाचा पुरावा लागतो. खातेधारकाने उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी, मागील आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात शिल्लक रकमेच्या ५०% रक्कम काढण्याची परवानगी आहे.
नोंदणीकृत मुलीचा मृत्यू झाल्यास, पालक खात्यात उरलेल्या रकमेवर आणि जमा झालेल्या व्याजासाठी पात्र होऊ शकतात. खात्यासाठी नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पैसे लगेच हस्तांतरित केले जातात. याव्यतिरिक्त, पालकांनी किंवा कायदेशीर पालकत्वाच्या प्रतिनिधींनी तुमच्या खातेदाराच्या मृत्यूची पुष्टी करणारी वैध कागदपत्रे, संबंधित अधिकार्यांनी स्वाक्षरी केलेली प्रदान करणे आवश्यक आहे.
* सुकन्या समृद्धी योजनेचे खाते खालील पैकी कोणत्याही बँकेत उघडू शकतो.........
- स्टेट बँक ऑफ इंडिया. (State Bank of India)
- बँक ऑफ महाराष्ट्र. (Bank of Maharashtra)
- बँक ऑफ इंडिया. (Bank of India)
- आय डी बी आय बँक.(IDBI Bank)
- आय सी आय सी आय बँक. (ICICI Bank)
- ऍक्सिस बँक. (Axis Bank)
खाते उघडण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
१) मुलीचा जन्म दाखला.
२) मुलीचे आधार कार्ड.
३) मुलीचे पासपोर्ट फोटो.
४) मुलीच्या आईचे व वडिलांचे आधार कार्ड.