Janmarathi

Sunny Deol Video: 'आप सनी देओल जैसे दिखते हो', शेतकऱ्याचे हे शब्द ऐकून सनी देओलही शॉक्ड.........!

Sunny Deol Video: आप सनी देओल जैसे दिखते हो, शेतकऱ्याचे हे शब्द ऐकून सनी देओलही शॉक्ड.........!
X

 Sunny Deol Video: 'आप सनी देओल जैसे दिखते हो', शेतकऱ्याचे हे शब्द ऐकून सनी देओलही शॉक्ड.........!

सनी देओल सध्या गदर २ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या सिनेमाचं शूटींग सुरू आहे. याच शूटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ सनी देओलने त्याच्या इस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओत सनी देओल भररस्त्यात एका शेतकऱ्याशी बैलगाडीत बसून गप्पा मारताना दिसतोय.

एक शेतकरी बैलगाडी घेऊन रस्त्याने घराकडे जात असताना अचानक त्याच्या समोर सनी देओल येतो. बैलगाडीतून काय घेऊन जाताय, असं सनी त्या शेतकऱ्याला विचारतो. यावर जनावरांसाठी खायला चारा घेऊन जातोय, असं शेतकरी सनी देओलला म्हणतो. यानंतर सनी देओल दुसऱ्या फ्रेममधून एन्ट्री करतो. तो शेतकऱ्याशी हातात-हात मिळवतो. बिचारा शेतकरी, तो सनी देओलला ओळखूच शकत नाही. तुम्ही तर बिल्कुल सनी देओल सारखे दिसता, असं तो म्हणतो. शेतकऱ्याचं ते वाक्य ऐकून सनी हसायला लागतो. हो, तो मीच आहे, असं सनी सांगतो तेव्हा शेतकऱ्याला आश्चर्याचा धक्का बसतो. अरे बापरे म्हणत तो आणखी एकदा सनीशी हात मिळवतो. आम्ही तुमचे चित्रपट बघतो. तुमचे व तुमच्या वडिलांचे चित्रपट व व्हिडीओ पाहतो, असं शेतकरी सनी देओलला सांगतो.

सनीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेकजण सनीचं कौतुक करत आहेत. शेतकऱ्याशी इतकं दिलखुलास बोलणारा हिंदी चित्रपटातील पहिला अभिनेता पाहिला, असं एक चाहता म्हणाला. या अभिनेत्यात अजिबात गर्व आणि रुबाब नाही, अशी कमेंटही एका चाहत्याने केली आहे.

सनीच्या गदर २ या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्या वेळेस हिट झाला होता. आता २२ वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. साहजिकच चाहते गदर २ पाहण्यासाठी क्रेझी झाले आहेत. 'गदर २' मध्ये सनी देओल पुन्हा एकदा तारा सिंगच्या भूमिकेत आहे. तर अमिषा सकिनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'गदर २' हा चित्रपट ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Next Story
Share it