Suresh Raina: सुरेश रैनाने कुटुंबासोबत साजरी केली होळी, पाहा त्यांचे रंगी-बेरंगी फोटो........!

Suresh Raina: सुरेश रैनाने कुटुंबासोबत साजरी केली होळी, पाहा त्यांचे रंगी-बेरंगी फोटो........!
भारताचा सर्वोत्तम फलंदाज सुरेश रैनाने कुटुंबासोबत होळी साजरी केली. त्याचे फोटोही त्याने शेअर केले आहेत. त्याने पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत चेहरा गुलालाने माखलेले फोटो शेअर केले आहेत.
३ एप्रिल २०१५ रोजी सुरेश रैना आणि प्रियांका विवाहबंधनात अडकले. आता दोघेही दोन मुलांचे पालक आहेत. रैनाने १८ कसोटी, २२६ एकदिवसीय आणि ७८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रैनाने आयपीएलमध्ये २०५ सामने खेळले असून ५५२८ धावा केल्या आहेत.
प्रियांका ही सुरेश रैनाचे पहिले प्रशिक्षक तेजपाल चौधरी यांची मुलगी आहे. मुरादनगरमध्ये जन्मलेल्या तेजपालने गाझियाबादमध्ये अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. सुरेश आणि प्रियांका मुरादनगर येथे शेजारी होते आणि त्यांचे कुटुंबीय एकमेकांना चांगले ओळखत होते.
२०१६ मध्ये सुरेश रैनाची पत्नी प्रियांकाने एका मुलीला जन्म दिला. हे त्यांचे पहिले अपत्य होते आणि काही वर्षांनी या जोडप्याला मुलगा झाला.
त्यांनी मुलीचे नाव ग्रेसिया ठेवले आहे. हे एक स्पॅनिश नाव आहे. ग्रसिया चा अर्थ सुंदर, दयाळूपणा, कृपा आणि सौम्य असा आहे. त्यांची मुलगी खूप गोंडस आहे आणि आता ती जवळपास ७ वर्षांची आहे.