Janmarathi

भारतीय तरुण, चीनी तरुणापेक्षा सरासरी आयुर्मानात १० वर्षांनी लहान.........!

भारतीय तरुण, चीनी तरुणापेक्षा सरासरी आयुर्मानात १० वर्षांनी लहान.........!
X

 भारतीय तरुण, चीनी तरुणापेक्षा सरासरी आयुर्मानात १० वर्षांनी लहान.........!

भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. चीनला मागे टाकत भारताने प्रथम क्रमांक मिळवला आहे. भूक आणि गरिबीसारख्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतासाठी ही चांगली बातमी नाही. आकडेवारी दर्शवते की सध्या देशाच्या लोकसंख्येचे सरासरी आयुर्मान २८.२ वर्षे आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) अहवालाच्या आधारे वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स (WPP) मध्ये ही आकडेवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, जर आपण चिनी लोकांच पाहिलं तर तेथील सरासरी आयुर्मान ३९ वर्षे आहे. भारतीय तरुण चीन तरुणा पेक्षा १० वर्षांनी लहान आहेत.

जागतिक क्रमवारीनुसार भारत युवकांच्या बाबतीत ९४ व्या स्थानावर आहे, तर चीन १७० व्या स्थानावर आहे. २३७ देशांचे मूल्यांकन केल्यानंतर हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रादेशिक विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, आशियातील तरुणांचे सरासरी आयुर्मान ३१.९ वर्षे आहे, जो जगातील तिसरा सर्वात तरुण भौगोलिक गट आहे. आफ्रिकेत सरासरी तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. येथे सरासरी आयुर्मान १८.८ वर्षे आहे. अमेरिकेत सरासरी आयुर्मान ३१ वर्षे आहे. उत्तर अमेरिकेचे सरासरी आयुर्मान ३८.४ वर्षे आणि युरोपचे ४२.२ वर्षे आहे.

UNFPA नुसार, या वर्षाच्या मध्यापर्यंत म्हणजेच जूनपर्यंत भारतात चीनपेक्षा ३ दशलक्ष अधिक लोक असतील, त्यानंतर भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जाईल. स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन २०२३ अहवालाचा अंदाज आहे, की चीनच्या १.४२५७ अब्जांच्या तुलनेत भारताची लोकसंख्या जून अखेरपर्यंत १.४२८६ अब्ज होईल.

याशिवाय, जूनच्या अखेरीस अमेरिका अंदाजे ३४० दशलक्ष लोकसंख्येसह जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनेल. अहवालातील आकडेवारी फेब्रुवारीपर्यंतच्या उपलब्ध माहितीवर आधारित आहे. मागील यूएन डेटा वापरून लोकसंख्या तज्ञांनी भाकीत केले आहे की, एप्रिलमध्ये भारताची लोकसंख्या चीनला मागे टाकेल, परंतु जागतिक संस्थेच्या नवीन अहवालात कोणतीही तारीख निर्दिष्ट केलेली नाही.

Next Story