Janmarathi

जगातील सर्वाधिक महाग द्राक्ष, एक किलो सोडा, एका घडाची किंमत वाचून आश्चर्य वाटेल......!

जगातील सर्वात महाग द्राक्ष, एक किलो सोडा, एका घडाची किंमत वाचून आश्चर्य वाटेल......!
X

जगातील सर्वात महाग द्राक्ष, एक किलो सोडा, एका घडाची किंमत वाचून आश्चर्य वाटेल......!

जगात मौल्यवान वस्तूंची कमतरता नाही. नेहमीच आपण महागड्या वस्तूंबद्दल अनेकदा ऐकत असतो. परंतु तुम्हला जगातील सर्वात महागड्या द्राक्षाची किंमत ऐकून आश्चर्य वाटेल. सध्या द्राक्षाचे सीजन सुरु आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात द्राक्ष विक्रीसाठी येत आहेत. भारतात हिरवी द्राक्षे ५० ते ८० रुपये किलो दराने विकली जात आहेत. तर काळ्या द्राक्षांचा दर ७० ते १३० रुपये किलो आहे. याशिवाय द्राक्षांचा आणखी एक प्रकार आहे, जो किलोने विकला जात नाही तर घडांमध्ये विकला जातो.


तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल मात्र रुबी रोमन द्राक्षांचा एक घड घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. या द्राक्षांच्या एका किलोची किंमत नाही तर, एका घडाची किंमत ७० हजारा पेक्षा जास्त आहे. रुबी रोमन ही विविध प्रकारचे टेबल द्राक्षे आहेत, जी इशिकावा प्रीफेक्चर, जपानमध्ये विकली जातात. ते लाल रंगाचे आणि पिंग-पाँग बॉलच्या आकाराचे असते. या द्राक्षाला जगातील सर्वात महाग द्राक्ष म्हटले जाते. रुबी रोमन द्राक्षांमध्ये आम्ल कमी आणि गोडपणा जास्त असतो आणि ते खूप रसदार असतात. प्रत्येक द्राक्षाचे वजन सुमारे २५ ग्रॅम असते.

महत्त्वाचं म्हणजे रुबी रोमन द्राक्षे मिळविण्यासाठी १४ ते १५ वर्षे वाट पाहावी लागते. २००८ मध्ये जपानी शेतकरी सुतोमू ताकेमोरी यांनी लागवड केलेल्या या प्रकारच्या पहिल्या द्राक्षांचा बाजारात लिलाव करण्यात आला होता. १४ वर्षांच्या मेहनतीनंतर द्राक्षांचा एक घड ९१० डॉलर्स म्हणजेच ७५ हजारांना विकला गेला होता. रुबी रोमन द्राक्षांचा एक घड, ज्यामध्ये सुमारे ७०० ग्रॅम वजनाची २६ द्राक्षे होती. २०१९ मध्ये रुबी रोमन द्राक्षांला सर्वाधिक किमत मिळाली होती. २०१९ च्या लिलावात या द्राक्षाच्या एक घड सुमारे ८ लाख ९० हजार रुपयांना विकला गेला होता. त्याचबरोबर या घडतील फक्त एकाच द्राक्षाची किंमत सुमारे २५ हजार रुपये होती.


रुबी रोमन द्राक्षांना जगातील सर्वोत्तम जातीचा दर्जा प्राप्त आहे. हे द्राक्ष सामान्य द्राक्षांपेक्षा ३ ते ४ पट मोठे आणि जाड आहेत. या एका द्राक्षाचे वजन सुमारे २० ते २५ ग्रॅम आहे. प्रीमियम क्वालिटी द्राक्षांचे वजन ३० ग्रॅमपर्यंत असते. २००८ मध्ये, रुबी रोमन द्राक्षे जपानमध्ये प्रीमियम द्राक्षाची नवीन विविधता म्हणून पदार्पण केल आहे. सार्वजनिक सार्वमताद्वारे नवीन द्राक्षाचे नाव रुबी रोमन ठेवण्यात आले. प्रत्येक द्राक्षाच्या गुणवत्तेची हमी देण्यासाठी काटेकोरपणे तपासले जाते, अशा प्रकारे निवडलेल्या द्राक्षावर प्रमाणपत्र सील लावले जातात. रुबी रोमनमध्ये विक्रीसाठी कठोर नियम आहेत; प्रत्येक द्राक्ष २० ग्रॅमपेक्षा जास्त आणि साखर १८% पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, एक विशेष "प्रिमियम वर्ग" अस्तित्वात आहे, ज्यासाठी द्राक्ष ३० ग्रॅमपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि संपूर्ण फळांच्या गुच्छाचे वजन किमान ७०० ग्रॅम असणे आवश्यक आहे. २०१० मध्ये, केवळ सहा द्राक्षे प्रीमियम दर्जासाठी पात्र ठरली होती.

Next Story