Success Story: मुंबईच्या या दोन तरूणांनी अत्यंत कमी वयात उभी केली ३३ हजार कोटीची कंपनी...!

Success Story: मुंबईच्या या दोन तरूणांनी अत्यंत कमी वयात उभी केली ३३ हजार कोटीची कंपनी...!
इच्छा आणि घाम गाळण्याची हिंमत असेल तर या जगात अशक्य असं काही नाही. प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरूवात लहान गोष्टीतूनच होत असते. सक्सेस स्टार्टअप सुरू करण्यासाठी दुर्दम्य इच्छा शक्ती हवी. जगातील अनेक मोठ्या स्टार्टअपची सुरूवात छोट्याशा घरातूनच झाली आहे. आज गुगल,ट्विटर किंवा अमेझॉन सारख्या कंपन्यांची सुरूवात देखील अशा काही विचारांतूनच झाली आहे. नकुल आणि रितेश यांनी स्थापन केलेल्या ब्राऊजरस्टेक नावाचा एक क्लाऊड वेब आणि मोबाईल टेस्टींगची कहाणी सारखीच आहे.
नकुल अग्रवाल आणि रितेश अरोरा या दोघांनी २०११ मध्ये ब्राऊझरस्टॅक कंपनीची स्थापना केली. दोघांनी २००६ मध्ये मुंबईच्या पवई आयआयटीतून कंम्प्युटर सायन्सची डिग्री मिळविली आणि इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर पाच वर्षांनी ही कंपनी स्थापन केली, सध्या या कंपनीचा बिझनेस जगातील बऱ्याच देशात पसरला आहे. फक्त १२ वर्षां नंतर या कंपनीचे भागभांडवल ३३ हजार कोटीवर पोहचले आहे. मुंबईतील पवई आयआयटीतून ग्रॅज्युएट झालेल्या नकुल अग्रवाल आणि रितेश अरोरा यांची भारतीय सॉफ्टवेअर युनिकॉर्न ब्राऊझरस्टॅक कंपनी सध्या प्रगती पथावर आहे. या कंपनीचा नफा २०२१ मध्ये २६३.३ कोटी रूपयांवरून आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ४१८.४ कोटी रूपये झाला आहे. कंपनीचे सह संस्थापक रितेश आणि नकुल यांची एकूण संपत्ती प्रत्येकी १० हजार कोटी आहे. तर कंपनीचा टर्न अवर ३३,००० कोटी रुपये आहे.
ब्राऊझरस्टॅक ही जगातील अडव्हान्स सॉफ्टवेअर टेस्टींग प्लॅटफॉर्म कंपनी आहे. २०० मिलियनची फंडींग मिळाल्यानंतर साल २०२२ मध्ये ही कंपनी युनिकॉर्न झाली. यांचे सॉफ्टवेअर, एच-ए- सर्व्हीस फर्मचे मूल्य ४ बिलीयन डॉलर ( सुमारे ३३,१०६) आहे. नकुल अग्रवाल आणि रितेश अरोरा यांची कंपनी सुरू झाल्यानंतर ६ महिन्यातच फायद्यात आली आहे. रितेश अरोरा आणि नुकुल अग्रवाल यांनी कंपनीतील जबाबदारी विभागून घेतली आहे. रितेश अरोरा हा कंपनीचा सीईओ म्हणून जबाबदारी पाहतो. तर नुकुल अग्रवाल हा कंपनीत सीटीओ म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.