Janmarathi

Top १०: सर्वाधिक सुंदर आणि हॉट WWE महिला रेसलर २०२३.........!

Top १०: सर्वाधिक सुंदर आणि हॉट WWE महिला रेसलर २०२३.........!
X

Top १०: सर्वाधिक सुंदर आणि हॉट WWE महिला रेसलर २०२३.........!

१.दाना ब्रुक: 'एशले माई सेबेरा' हे तीच मूळ नाव आहे. २०१३ मध्ये NXT मध्ये सामील होण्यापूर्वी ब्रूकने अनेक फिटनेस स्पर्धांमध्ये भाग घेतला. नैसर्गिकरित्या मजबूत असलेल्या ब्रुकने लवकरच रेसलिंग रिंगमध्ये प्रभुत्व मिळवले. २०१५ अर्नोल्ड स्पोर्ट्स फेस्टिव्हलमध्ये, ती फिटनेस इंटरनॅशनल स्पर्धेत भाग घेणारी पहिली WWE सुपरस्टार बनली.

२.बेकी लिंच: रेबेका क्विन हे बेकीचे मूळ नाव आहे आणि हि एक आयरिश व्यावसायिक रेसलर आहे. लिंच WWE मधील सर्वाधिक प्रसिद्द आणि सर्वाधिक कमाई करणारी रेसलर आहे. क्विनने २००२ मध्ये एक व्यावसायिक कुस्तीपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिने विशेषत: एलिट कॅनेडियन चॅम्पियनशिप रेसलिंगमध्ये भाग घेतला आणि २००७ मध्ये ती पहिली सुपरगर्ल्स चॅम्पियन बनली. २०१२ मध्ये, क्विनला एका सामन्यादरम्यान डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यामुळे, तीला अनेक वर्षे कुस्तीपासून दूर राहावे लागले. ती २०१३ मध्ये रेसलिंगच्या दुनियेत परतली आणि २०१४ मध्ये WWE सह करारावर स्वाक्षरी केली. ती २०१६ मध्ये पहिल्यांदा स्मॅकडाउन महिला चॅम्पियन बनली आणि तिने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. २०२३ मध्ये तिच्या WWE महिला टॅग टीम चॅम्पियनशिप जिंकून, ती WWE ची सहावी महिला ट्रिपल क्राउन चॅम्पियन बनली.

३. लेसी इव्हान्स: ही WWE मध्ये साइन केलेली एक अमेरिकन व्यावसायिक कुस्तीपटू आहे. मरीनमध्ये लष्करी पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना कुस्तीशी ओळख झाली. लेसी, एपीडब्ल्यू वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप विनर आहे. २०१९ मधील PWI च्या यादीत शीर्ष १०० महिला कुस्तीपटूंपैकी २३ क्रमांकावर होती.

४.अलेक्सा ब्लिस : ९ ऑगस्ट १९९१ रोजी जन्मलेली अलेक्सा ही एक अनुभवी रेसलर आहे. तिने लहानपणा पासून किकबॉक्सिंग, ट्रॅक, जिम्नॅस्टिक्स, सॉफ्टबॉल आणि ट्रॅकमध्ये पाच वर्षांची असल्यापासून भाग घेतला आहे. याव्यतिरिक्त, ती तिच्या हायस्कूलमध्ये एक चीअरलीडर होती. तिचे मूळ नाव 'अॅलेक्सिस कॉफमन' आहे. ब्लिसला फाइव्ह फीट ऑफ फ्युरी, लेक्सी, लिटिल मिस ब्लिस, या टोपणनावाने देखील ओळखले जाते. २०१३ मध्ये तिने WWE कंपनीसोबत करार केला आणि रॉ आणि स्मॅकडाउन हे दोनीही महिला चॅम्पियन विजेतेपद मिळवले आहेत.

५. लाना (कॅथरीन जॉय पेरी) ही WWE मधील सर्वात लोकप्रिय महिला कुस्तीपटूंपैकी एक आहे. पेरीचा जन्म २४ मार्च १९८५ रोजी गेनेसविले, फ्लोरिडा येथे झाला. ती पोर्तुगीज आणि व्हेनेझुएलाच्या वंशाची आहे. पेरीला तिच्या आईप्रमाणे बॅले डान्सर बनण्याची इच्छा होती. तिने रीगा कोरिओग्राफी स्कूल (लॅटव्हियन नॅशनल ऑपेराची बॅले स्कूल) येथे शिक्षण घेतले आणि वयाच्या १४ व्या वर्षी लॅटव्हियन नॅशनल बॅलेसह नृत्य करण्यास सुरुवात केली. RIDGID टूल कॅलेंडर सारख्या प्रकाशनांमध्ये दिसणारी आणि मॅट्रिक्स आणि रेड बुल या एनर्जी ड्रिंक्ससाठी प्रवक्ता म्हणून काम करताना पेरीने मॉडेलिंग करिअरमध्ये वर्चस्व प्राप्त केले. FSU मधून पदवी प्राप्त केल्यावर, तिने शो व्यवसायात काम करण्याच्या उद्देशाने लॉस एंजेलिस येथे स्थलांतर केले.

६. कार्मेला: 'लेह व्हॅन डेल' हे कार्मेलाचे मूळ नाव आहे. WWE च्या सर्वाधिक सुंदर महिलांच्या यादीत डेल सहाव्या क्रमांकावर आहे. तिने गेल्या काही वर्षांमध्ये रेसलिंगच्या जगतात उच्च दर्जाच्या महिला कुस्तीचे प्रदर्शन केले आहे. सेक्सी असण्याव्यतिरिक्त, तिने स्वतःला सर्वात मजबूत कुस्तीपटू असल्याचे सिद्ध केले आहे. रिंगमधील तिच्या प्रतिभेच्या व्यतिरिक्त, ती एक माजी NBA आणि NFL नृत्यांगना आहे, ज्यामध्ये तिने जबरदस्त नृत्य केले आहे.

७. ईवा मेरी: ईवाचा जन्म सॅन दिएगो येथे २५ जुलै १९८३ रोजी झाला. ती एक निवृत्त व्यावसायिक कुस्तीपटू आणि माजी मार्शल आर्टिस्ट आहे. तिने अनुक्रमे सहा महिला चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत, तीन रॉ आणि स्मॅकडाउन पदक विजेती आहे. तिचे मूळ नाव 'नताली मेरी नेल्सन' आहे.

८. बिली के: रेसलिंग जगतात येण्याअगोदर बिलीने ऑस्ट्रेलियामध्ये बास्केटबॉल खेळाडू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. रिंगमध्ये ती तिच्या उंचीचा चांगलाच फायदा घेत असते. तिचे मूळ नाव 'जेसिका मॅके' आहे. के ने २०१५ मध्ये WWE मध्ये प्रवेश केला.

९. मॅंडी रोज: 'अमांडा रोझ सॅकोमॅनो' हे मॅंडीचे मूळ नाव आहे. रोझच्या हॉटनेसची स्तुती करताना दर्शक कधीच थकत नाहीत. रेसलिंगच्या जगतात तिला 'गोल्डन गर्ल' म्हणून ओळखले जाते. २०२० मध्ये प्रथमच तिने महिला एलिमिनेशन चेंबर मॅच आणि वुमेन्स रॉयल रंबल यासारख्या ऐतिहासिक इव्हेंटमध्ये भाग घेतला होता.

१०. शार्लोट फ्लेअर: हि एक महान रेसलर आहे. तिने आता पर्येंत १६ वेळा WWE ची चॅम्पियन आहे. २०१४ पासून ती रेसलिंगच्या दुनियेत अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आहे.

Next Story