Trending News: ख से खबुतर, ग से गबूतर ... परीक्षेत विद्यार्थ्यांचे उत्तर पाहून शिक्षक झाले थक्क.......!

Trending News: ख से खबुतर, ग से गबूतर ... परीक्षेत विद्यार्थ्यांचे उत्तर पाहून शिक्षक झाले थक्क.......!
लहान मुलं अभ्यास करतात तेव्हा ते त्यांच्या वहीत अशा गोष्टी लिहितात की, त्या पाहून कुणालाही हसू येईल. सध्या सोशल मीडिया वर तिसरीच्या मुलाचा हिंदीचा पेपर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. लहानपणी मुलांना हिंदी शिकवले जाते तेव्हा त्यांना शब्दांच्या पहिल्या अक्षरांशी सजीव आणि निर्जीव गोष्टी जोडून सांगितले जाते. उदाहरणार्थ, क से कबूतर, ब से बदक अशा शब्दांद्वारे मुलांना शिकवले जाते. शिक्षक जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा बरोबर उत्तरे देऊ शकणारी मोजकीच मुले असतात, तर बहुतांश मुले चुकीचे लिहून निघून जातात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये असेच काहीसे दिसले आहे.
शाळेत शिक्षकांनी हिंदी वर्णमालाशी संबंधित शब्द लिहिण्यासाठी परीक्षा घेतली होती परंतु मुलाने काहीतरी वेगळेच लिहिले आहे. हे पाहून एका वापरकर्त्याने लिहिले की, "याने प्रत्येक प्रकारचे कबूतर उडवले आहे". तर दुसर्याने लिहिले, "च से चबुतर तो सही है.