Janmarathi

Video: अवघ्या दहा महिन्याच्या बाळाला सोडून वर्षा निघाली देश सेवेसाठी......वाचा BSF महिला जावन वर्षा पाटीलची कहाणी...!

Video: अवघ्या दहा महिन्याच्या बाळाला सोडून वर्षा निघाली देश सेवेसाठी......वाचा BSF महिला जावन वर्षा पाटीलची कहाणी...!
X

Video: अवघ्या दहा महिन्याच्या बाळाला सोडून वर्षा निघाली देश सेवेसाठी......वाचा BSF महिला जावन वर्षा पाटीलची कहाणी...!

कोल्हापूर जिल्ह्यतील नांदगाव ची वर्षा पाटील आपल्या अवघ्या दहा महिन्याच्या बाळाला सोडून देश सेवेसाठी जातानाचा एक भावुक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पहिल्याच्या नंतर खरंच जीवनात भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व जास्त असते आणि ते कर्तव्य देशसेवा करण्याचं असेल, तर मग सर्वस्वाचा ही त्याग करावाच लागतो. हे वर्षाराणी यांनी सिद्ध केलं आहे. महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. जसे एक महिला कुटुंब सांभाळू शकते,तसेच देश पण सांभाळू शकते हे या महान आई ने सिद्ध केलं आहे.

एकीकडे मातृत्व, तर दुसरीकडे कर्तव्य अशी जबाबदारी पार पाडत भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये कर्तव्य निभवणाऱ्या वर्षा रमेश पाटील या प्रसूती व बालसंगोपन रजा संपल्यानंतर ११ महिन्याच्या 'दक्ष ' चिमूरड्याला घरी ठेवून कर्तव्यावर जाताना दिसल्या. देशसेवेसाठी कर्तव्यावर निघालेल्या एका कणखर आईच्या मातृत्वाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ पाहून सर्वांचा ऊर अभिमानाने भरून आला.

आई आणि बाळाची ताटातूट पाहून एखाद्या चित्रपटाला शोभेल असा प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे . हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत आहे. या महान आईचे ' माँ तुझे सलाम ' म्हणून सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वर्षा, २०१४ साली आई,वडिल,भाऊ यांच्या भक्कम पाठिंब्यावरती सीमा सुरक्षा दलामध्ये भरती झाल्या. खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्या गुजरात येथील भुज सीमेवर रुजू झाल्या. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील राजपथावरील बीएसएफ मधील महिला रणरागिणींच्या दुचाकीचा चित्त थरारक प्रात्यक्षिकात वर्षाचा सहभाग थक्क करणारा आहे.

वर्षाचा २०१९ ला दऱ्याचे वडगाव ता. करवीर येथील रमेश मगदूम यांच्याशी विवाह झाला. पती रमेश व त्यांच्या कुटुबीयांनी ही वर्षाला भक्कम पाठिंबा दिला. २०२२ मध्ये बाळाचा जन्म झाल्या नंतर त्याचे नाव ही 'दक्ष' ठेवले आहे. मातृत्वाच्या आनंदाने भारावून गेलेल्या आईला प्रसुती व बालसंगोपन रजा संपल्यानंतर पुन्हा देशसेवेत रुजू व्हायचे आहे याची जाणीव असल्याने तिच्या मनाची थोडी घालमेल होत असायची. तरीदेखील रजेच्या कालावधीतील आनंद कुटुंबीयांसोबत मनमुरादपणे घेत सर्व क्षण बाळाला कुशीत घेत घालविले. मातृत्वाची ओढ असताना देखील कर्तव्याची जाणीव असलेल्या या आईने धैर्याने सामोरे जात मंगळवारी रात्री त्या गुजरातकडे रवाना झाल्या. सध्या त्यांची बदली राजस्थान येथे झाली आहे.

Next Story