Janmarathi

Video: पत्नी मितालीसाठी शार्दूल ठाकूर ने घेतला खास उखाणा......!

Video: पत्नी मितालीसाठी शार्दूल ठाकूर ने घेतला खास उखाणा......!
X

Video: पत्नी मितालीसाठी शार्दूल ठाकूर ने घेतला खास उखाणा......!

टीम इंडियाचे तीन स्टार खेळाडू नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत. नुकतंच टीम इंडियाचा स्टार खेळाडू म्हणजेच 'लॉर्ड' शार्दूल ठाकूरने देखील मितालीसोबत लग्न केलं आहे. शार्दुल ठाकुरने प्रेयसी मिताली पारुळकरबरोबर लग्नबंधनात अडकला. दोघांनी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईमध्ये मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं. अशातच मराठमोळ्या शार्दुलने त्याची पत्नी मितालीसाठी एक खास उखाणा घेतला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडिया वर तूफान व्हायरल होत आहे.

शार्दुल आणि मितालीचं लग्न अगदी मोठ्या थाटामाटात पार पडलं. लग्नाच्या आधी संगीतसेरेमनी आणि हळदीचा कार्यक्रम देखील झाला. शार्दूलचा हळदीतील आणि संगीतसेरेमनी मधील डान्सचे व्हिडीओ सोशल मीडिया वर चांगलेच व्हायरल होत आहेत. या लग्नामधील फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर,सिदेश लाड या सारख्या स्टार खेळाडूनी आपल्या कुटुंबियांबरोबर या लग्नाला उपस्थित होते.

लग्नबंधनात अडकल्यानंतर मराठमोठ्या परंपरेप्रमाणे शार्दुलने मितालीसाठी एक खास उखाणा घेतला. शार्दूलने घेतलेल्या उखाण्यामध्ये क्रिकेटचाही समावेश असल्याचं दिसून आलं. शार्दूलने घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये शार्दूल म्हणतो कि, बॉलिंग करतो क्वीक... रन पण धावतो क्वीक... मिताली आमची सुंदरतेचं प्रतीक...

शार्दूलचा हा उखाणा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच फार आवडलाय. शार्दूलची पत्नी मितालीलाही हा उखाणा आवडला असून उखाणा ऐकून ती देखील हसून टाळ्या वाजवताना दिसतेय. भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, अभिषेक नायर आणि मुंबईतील संघांशीसंबंधित सिद्देश लाडही या कार्यक्रमांना उपस्थित होते. सध्या या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शार्दुलची ओळख क्रिकेट जगतात 'लॉर्ड' शार्दुल अशी आहे. त्यामुळेच आपल्या लाडक्या लॉर्डला त्याचे अनेक चाहते शुभेच्छा देतना दिसत आहेत.

Next Story
Share it