Janmarathi

Viral Holi Video: कोणी ढोलवर बसून, तर कोणी बाईकवर रोमान्स करत......पाहा होळीचे सर्वाधिक व्हायरल झालेले विडिओ !

Viral Holi Video: कोणी ढोलवर बसून, तर कोणी बाईकवर रोमान्स करत......पाहा होळीचे सर्वाधिक व्हायरल झालेले विडिओ !
X

Viral Holi Video: कोणी ढोलवर बसून, तर कोणी बाईकवर रोमान्स करत......पाहा होळीचे सर्वाधिक व्हायरल झालेले विडिओ !

सध्या सोशल मीडियावर होळीचे रंगी-बेरंगी व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. होळीच्या आनंदात लोकांनी केलेले कारनामे आणि त्याचे परिणाम आता समोर येत आहेत. या आनंदाच्या भरात काहींनी तर तुरुंगाची हवा खाल्ली आहे. सध्या राजस्थानमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक रोमँटिक कपल चालत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. एक युवती मोटरसायकलच्या पेट्रोलच्या टाकीवर बसली आहे आणि युवक गाडी चालवत आहे. दोघेही एकमेकांना घट मिठी मारून बसले आहेत आणि युवती अश्लील चाळे करताना दिसत आहे. दोघेही एकमेकांचे चुंबन घेत आहेत. हा व्हिडिओ राजस्थानची राजधानी जयपूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ होळीच्या दिवसाचा आहे.

व्हायरल व्हिडीओ जयपूरच्या जवाहर सर्कल चौकातील आहे. दोघांनीही हेल्मेट घातलेले नाही. लोकांनी खुलेआम वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या जोडप्याचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ राजस्थानच्या वाहतूक पोलिसांपर्यंतही पोहोचला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पोलिसांनी या जोडप्याचा शोध सुरू केला आहे. दुचाकीच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Next Story