Viral News: ४० वर्षापूर्वी एका समोसासाठी किती पैसे मोजावे लागत होते? हॉटेलच मेन्यू कार्ड पाहून थक्क व्हाल !

Viral News: ४० वर्षापूर्वी एका समोसासाठी किती पैसे मोजावे लागत होते? हॉटेलच मेन्यू कार्ड पाहून थक्क व्हाल !
Viral News: सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. असंच १९८० मधील एका हॉटेलच मेन्यू कार्ड सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. या मेन्यू कार्डमधील दर पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ज्याप्रमाणे आपण भविष्याची काळजी करतो, तितकेच आपण आपल्या भूतकाळात रमलेलो असतो. वेळेसोबत गोष्टी कसा बदलत जातात. पण नंतर हे बदल आपण आपल्या भूतकाळाशी तुलना करू पाहतो तेव्हा मात्र झालेला बदल पाहून आपण आश्चर्यचकित होतो. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपल्या अशा अनेक गोष्टीची आठवण करून देतात. मग ते जुने फोटो असो किंवा बिल, मग काही कागदपत्रं असोत. जसजसं आपण पुढे जात असतो तसतसं या गोष्टी एक वेगळाच अनुभव देत असतात. असंच एक जुनं हॉटेलच मेन्यू कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या मेन्यू कार्ड मध्ये कचोरी आणि समोसाची किंमत पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. जवळपास या मेन्यू कार्ड मध्ये २४ प्रकारच्या पदार्थाचे दर दिले आहेत.
सध्याच्या काळात महागाई इतकी वाढली आहे की, पूर्वी इतक्या पैशात काय मिळायचं याची चर्चा नेहमीच रंगलेली असतो. ८० च्या दशकातील तरुण आज जेव्हा २० रुपयाचा वडापाव खातात तेव्हा आपण लहान असताना १ रुपयात मिळायचा अशी चर्चा करताना दिसतात. त्यातच आता १९८० मधील हॉटेलच मेन्यू कार्ड सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. या मेन्यू कार्डमधील दर पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल.
फेसबुकवर हे मेन्यू कार्ड शेअर करण्यात आलं आहे. यामध्ये मिठाईचा दर पाहून तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही. आज एका समोसासाठी आपल्याला १५, २० रुपये मोजावे लागतात. पण १९८० मध्ये हाच दर फक्त ५० पैसे इतकाच होता. आता तुम्ही म्हणत असाल ५० पैसे कुठे आणि हे १५ ते २० रुपये कुठे....! एवढच कशाला आज जितक्या पैशात तुम्ही एक समोसा खाता, तितक्या म्हणजे १५ ते २० रुपयात एक किलो लाडू, रसगुल्ले अशी मिठाई मिळत होती. या मेन्यू कार्डमध्ये पाहिलंत तर सर्व मिठाई २० रुपयांपेक्षा कमी किंमतीत किलोच्या दराने उपलब्ध आहेत. समोसा आणि कचोरी तर फक्त ५० पैशात मिळत होते. सध्याच्या घडीला तर ५० पैसे चलनातच नाहीत.
Garget Huchel नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन हे मेन्यू कार्ड शेअर करण्यात आलं आहे. २० फेब्रुवारीला शेअर केलेल्या या मेन्यू कार्डवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मग हे मेन्यू कार्ड पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? तुमची बहुमूल्य प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स मध्ये लिहून आम्हाला कळवा.