Janmarathi

इंडियन वॉटर वर्क्स तर्फे मुंबई महानगर पालिकेला जल निर्मलता पुरस्कार

इंडियन वॉटर वर्क्स तर्फे बी एम सी ला जल निर्मलता पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांनी आनंद व्यक्त केला आहे.

इंडियन वॉटर वर्क्स तर्फे मुंबई महानगर पालिकेला जल निर्मलता पुरस्कार
X

शुद्ध पाण्याचा पुरवठा करत असल्याने मुंबई महानगर पालिकेला जल निर्मलता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. इंडियन वॉटर वर्क्स या प्रचलित संस्थेतर्फे हा पुरस्कार गौरविण्यात आला आहे. सर्व मुंबईकरांसाठी ही चांगली बातमी आहे. मुंबईकरांच्या घरात जे पाणी येतं ते बाटलीबंद म्हणजे मिनरल वॉटर पेक्षाही स्वच्छ असते असे या इंडियन वॉटर वर्क्स या संस्थेतर्फे म्हणण्यात आलं आहे.

इंडियन वॉटर वर्क्स या प्रतिष्टित संस्थेने केलेल्या तपासणीत मुंबई तपासणीत मुंबईतील पाणी हे 99.34 टक्के शुद्ध असल्याचा समोर आला आहे. मुंबई शहराला शहरातील वरळी करीरोड, शिवडी, मालाड, कांदिवली, जोगेश्वरी, पवई, साकीनाका, घाटकोपर, चेंबूर, या ठिकाणाहून पाण्याचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील सर्व ४७ नमुने शुद्ध असल्याचे आढळले.

मुंबई महापालिकेतर्फे दरवर्षी तीन हजार आठशे पन्नास दशलक्ष पाण्याचा पुरवठा केला जातो. मुंबईतील पाणी शुद्ध असल्याचा निष्कर्ष पुढे आल्यामुळे मुंबईकरही महापालिकेवर ती खुश झाले आहेत.

Next Story