मध्य प्रदेशात भरतो महिलांचा बाजार, १५ हजार रुपयांत भाड्याने मिळते बायको......!

मध्य प्रदेशात भरतो महिलांचा बाजार, १५ हजार रुपयांत भाड्याने मिळते बायको......!
भाड्याच्या बायका: मध्य प्रदेशात एक अशी जागा आहे, जिथे बायका भाड्यानेही मिळतात. तुम्हाला ऐकायला थोडं विचित्र वाटेल आणि तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात 'धडीचा' नावाची प्रथा आहे, ज्या अंतर्गत आजही अविवाहित मुलींपासून विवाहित बायका भाड्याने मिळतात. त्यासाठी १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंतच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करावा लागतो. येथे येणारे पुरुष आपल्या आवडत्या महिलेला ठराविक कालावधीसाठी रक्कम देऊन भाड्याने घेतात.
दरवर्षी ठराविक वेळेत धडीचा बाजार भरतो. यामध्ये सहभागी होण्यासाठी दूरदूरवरून खरेदीदार आणि पुरुष येतात. अविवाहित मुलींशिवाय विवाहित महिलाही येथे येतात. प्रत्येकाची वागणूक पाहून त्यांची रक्कम निश्चित केली जाते आणि खरेदीदार विशिष्ट कालावधीसाठी मुली किंवा महिलांना पत्नी म्हणून घेऊन जातात.
मिळालेल्या माहितीनुसार, या बाजारात बायकांची किंमत १५ हजार रुपयांपासून सुरू होते आणि ४ लाख रुपयांपर्यंत जाते. पुरुष पत्नीला एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी रक्कम देऊन भाड्याने घेतो. १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंतच्या स्टॅम्प पेपरवर दोन्ही पक्षांमध्ये करार होतो. यामध्ये दोन्ही पक्षांच्या अटी लिहिल्या जातात. यानंतर पती-पत्नी दोघेही करारावर स्वाक्षरी करतात. डील झाल्यानंतर नवरा ठरवतो की, त्याला ही बायको हवी आहे की दुसरी कोणीतरी. जर त्या व्यक्तीला तीच पत्नी पुन्हा हवी असेल, तर त्याला बाजारात जाऊन पुन्हा करारनामा करून घ्यावा लागतो आणि रक्कम भरावी लागते.
बायका करार मोडू शकतात का......?
आता प्रश्न असा पडतो की, या बार्गेन मॅरेजमध्ये बायकोने खूश असणं आवश्यक आहे का? आणि जर तो पुरुष तिला आनंदी ठेवत नसेल तर तिने काय करावे? या प्रकरणात, पत्नीला करार मोडण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर ती नातेसंबंधात आनंदी नसेल, तर ती मध्येच करार मोडू शकते, परंतु तसे करण्यासाठी तिला स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. यानंतर महिलेला निश्चित रक्कम खरेदीदाराला परत करावी लागते.