Success Story: हमाल बनला आयएएस अधिकारी, रेल्वेच्या मोफत वायफायचा उचलला फायदा......!

Success Story: हमाल बनला आयएएस अधिकारी, रेल्वेच्या मोफत वायफायचा उचलला फायदा......!
आपण अनेक यशस्वी आणि प्रमुख अधिकाऱ्याच्या अनेक कथा वाचतो. त्यांची रणनीती, कठोर परिश्रम, समर्पण, आणि कठीण परिस्थितीतुन मार्ग काढीत आलेले असतात. काही कथा इतक्या अनोख्या आणि विचित्र असतात की, त्या आपल्या कायम प्रेरणा देत राहतात. जिद्द आणि यशाच्या अशा कथा वाचून इच्छुकांना प्रेरणा मिळते. या लेखात, आपण केरळमधील कुली श्रीनाथ के याच्या प्रवासामागील कथा वाचू, त्याने कठीण परिस्थितीचा सामना केला आणि UPSC परीक्षा यशस्वीपणे कशी दिली हे पाहुयात..........
मुन्नारचे मूळ रहिवासी असलेले IAS श्रीनाथ के केरळमधील एर्नाकुलम येथे रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम केलं आहे. जे मुन्नारचे सर्वात जवळचे मध्य रेल्वे स्थानक आहे. श्रीनाथ हा मध्यमवर्गीय कुटुंबातील होता. तो रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे सामान व बॅग नेण्याचे काम करत असे. त्यांनी स्वतःला संपूर्ण झोकून देऊन कुटुंबाला आर्थिक पाठबळ दिले.
२०१८ मध्ये, वयाच्या २७ व्या वर्षी, जेव्हा तो एका वर्षाच्या मुलीचा बाप झाला, तेव्हा त्याला समजले की त्याचे उत्पन्न त्याच्या कुटुंबासाठी पुरेसे नाही. आपल्या अल्प कमाईमुळे आपल्या लहान मुलीला आयुष्यात त्रास होऊ नये असे त्याला वाटत होते. म्हणून त्यांनी कठोर परिश्रम करण्यास सुरवात केली. रेल्वे स्टेशनवर काम करताना ऑनलाइन लेक्चर्स ऐकण्यासाठी त्यांनी वायफायचा वापर केला. पुस्तकांवर किंवा कोणत्याही कोचिंग क्लासवर खर्च करण्याऐवजी, श्रीनाथने परीक्षेची तयारी करण्यासाठी केवळ विनामूल्य वायफायचा फायदा घेतला. एक स्मार्टफोन, एक मेमरी कार्ड, एक जोडी इयरफोन आणि फ्री वायफाय या सर्व गोष्टी त्याला त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक होत्या.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दर वर्षी लाखो उमेदवार आपले नशीब आजमावतात. त्यासाठी मोठ्या इन्टिट्यूटमध्ये लाखो रुपये खर्च करतात. मात्र मूळचा केरळचा असलेला श्रीनाथने रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करत असताना कोणत्याही कोचिंगची मदत न घेता यूपीएसी मध्ये यश मिळवले आहे. यूपीएसी आधी श्रीनाथ ने केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही आपल्या नावाचा झेंडा फडकवला आहे. श्रीनाथला कोचिंग सेंटरची फीस परवडत नव्हती. मात्र रेल्वे स्टेशनच्या वाय-फाय मुळे त्याचा अवघड मार्ग सुकर झाला. या वाय-फायच्या मदतीनं आपल्या स्मार्टफोनवर यूपीएसीचा अभ्यास सुरु केला. हमाल म्हणून काम करता-करता श्रीनाथ ने यूपीएसीचे युट्युब वरील ऑनलाइन लेक्चर ऐकणे चालू केले. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर श्रीनाथ ने यूपीएसीत घवघवीत यश मिळविले आहे. तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोएल यांनी हमाल श्रीनाथचे सिव्हिल सर्विस परीक्षेतील यशा बदल ट्विट करून अभिनंदन केले आहे.