Janmarathi

Talathi Bharti २०२३: अखेर तलाठी भरती प्रक्रियाचा मुहूर्त सापडला, या तारखे पासून चालू होणार भरती प्रक्रिया: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.......!

Talathi Bharti २०२३: अखेर तलाठी भरती प्रक्रियाचा मुहूर्त सापडला, या तारखे पासून चालू होणार भरती प्रक्रिया: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.......!
X

Talathi Bharti २०२३: अखेर तलाठी भरती प्रक्रियाचा मुहूर्त सापडला, या तारखे पासून चालू होणार भरती प्रक्रिया: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.......!

Talathi Bharti 2023: तलाठी भरतीसंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तलाठी भरती प्रक्रिया १५ मार्च पासून सुरु होणार असं ते म्हणाले. ते अहमदनगरमधील लोणी येथे दोन दिवसीय महसूल परिषदेत बोलत होते.

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे दोन दिवसीय महसूल परिषद संपन्न झाली. या परिषदला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनीही उपस्थिती लावली. दोन दिवस चाललेल्या या महसूल परिषदेत अनेक असे महत्वाचे धोरण निश्चित करण्यात आले असून या धोरणांपैकी वाळू लिलावाचे महत्त्वाचे धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे. लवकरच ते कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. प्रथमच अशी परिषद यशदाच्या बाहेर ग्रामीण भागात घेण्यात आली आणि यापुढे सुद्धा पुण्याच्या बाहेर परिषद घेण्याचा मानस महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.

राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्रकल्पाबाबत भूसंपादनात येणाऱ्या अडथळ्याबाबत चर्चा झाली आहे. तसेच वाळू धोरणाबद्दल चर्चा झाली. शाळा प्रवेशासाठी विविध दाखले लागतात त्यात सुलभता येणार. ते म्हणाले की, सौर उर्जा हा देखील महत्वाचा विषय आहे. लवकरच शेतकऱ्यांना सलग १२ तास वीज नियमित देता येणार आहे. पुढील ६ महिन्यात बांध, शिवरस्ते याबाबत मिशन मोडवर काम करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Next Story
Share it