Janmarathi

Fake Currency: परभणीत 'फर्जी' वेब सीरिजचा रेमिक... चक्क प्रिंटरवर छापल्या २०० आणि ५०० च्या बनावट नोटा...!

Fake Currency: परभणीत फर्जी वेब सीरिजचा रेमिक... चक्क प्रिंटरवर छापल्या २०० आणि ५०० च्या बनावट नोटा...!
X

Fake Currency: परभणीत 'फर्जी' वेब सीरिजचा रेमिक... चक्क प्रिंटरवर छापल्या २०० आणि ५०० च्या बनावट नोटा...!

काही दिवसापूर्वी शाहिद कपूरचा 'फर्जी' ही वेब सीरिज बनावट नोटावर तयार करण्यात आली होती आणि या वेब सीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद ही मिळाला आहे. या वेब सीरिजप्रमाणेच चक्क प्रिंटरवर बनावट नोटा तयार करणाऱ्या परभणीतील एका २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. परभणी पोलिसांनी ही कारवाई केली असून परभणी जिल्ह्यातील मानवत तालुका या ठिकाणी असलेल्या २०० आणि ५०० च्या बनावट नोटा, प्रिंटर, कागद आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. विशाल खरात असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.

अवैध धंद्याच्या अनुषंगाने परभणीच्या मानवत तालुक्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक संध्याकाळी पेट्रोलिंग करत असताना त्यांना या ठिकाणाची गुप्त बातमी मिळाली. मानवत शहरामध्ये एक जण बनावट नोटा तयार करत असल्याच्या पक्क्या खबरीनंतर पोलिसांनी या ठिकाणी दोन पंचांना समक्ष घेऊन छापा टाकला. मानवत तालुक्यातील खंडोबा रोड या ठिकाणी एका घरावर हा छापा टाकण्यात आला. या घरांमध्ये २० वर्षाचा एक युवक विशाल संतोष खरात याला सॉप्टवर पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची कसून विचारपूस केली असता, त्याने कबुल केले कि,तो प्रिंटरवर बनावट नोटा छापत होता. पोलिसांनी २०० आणि ५०० च्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. संतोष खरात पासून २०० च्या आणि ५०० च्या तब्बल ३०,२०० नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी या ठिकाणचे पिक्समा कंपनीचे जी २०१५ चे प्रिंटर, रिफील इंक, लिक्विड करता वापरलेली पिवळ्या रंगाची प्लास्टिक बॉटल, हिरवी, सिल्वर, पोपटी आणि गुलाबी रंगाची चिकटपट्टी, नटराज कंपनीचे पांढरे पेपर, १२० पांढऱ्या रंगाचे पेपर ज्यावर दोन्ही बाजूने ५०० च्या छापलेल्या बनावट नोटा, विविध कंपन्यांचे पांढरे पेपर असा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक दिलावर खान, रशीद खान पठाण यांच्या फिर्यादीवरून विशाल खरात या तरुणाच्या विरोधात मानवत पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४८९ (अ), ४८९ (क), ४८९ (ड) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Next Story