Janmarathi

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या इन्स्पेक्टर आणि इंस्टाग्राम स्टार नयना कंवलच नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घ्या.......!

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या इन्स्पेक्टर आणि इंस्टाग्राम स्टार नयना कंवलच नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घ्या.......!
X

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या इन्स्पेक्टर आणि इंस्टाग्राम स्टार नयना कंवलच नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घ्या.......!

राजस्थान मधील पोलिस निरीक्षक नयना कंवल यांना गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्याच्या प्रकरणात अटक केली होती. तिने खिडकीतून दोन बेकायदेशीर बंदुक फेकल्याचा आरोप असताना तिचा कथित मित्र सुमित नंदल याच्याशी संबंधित असलेल्या अपहरण प्रकरणाच्या संदर्भात पोलिसांनी तिच्या फ्लॅटवर छापा टाकला होता. पोलिसांनी बंदुका ताब्यात घेऊन तिला अटक केली आहे. राजस्थान सरकारने तिला निलंबित करून या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

कोण आहे नयना कंवल?

नयना कंवलचा जन्म १९९६ मध्ये हरियाणातील पानिपत येथे झाला. ती आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहे. तिचे वडील रामकरण आणि आई बाला देवी दोघेही त्यांच्या सुतना गावचे सरपंच आहेत. तिचे भाऊ आणि वडील कुस्तीचे शौकीन होते.

नयनाने आता पर्यंत सात वेळा हरियाणा केसरी पुरस्कार जिंकला आहे. २०२२ मध्ये ती राजस्थान पोलिसात उपनिरीक्षक पदी विराजमान झाली. तिला क्रीडा कोट्यातून नोकरी मिळाली होती. मात्र, तिच्या या बेजबाबदार कामामुळे अवघ्या वर्षभरातच तिला पोलिसांनी अटक केली.

नैनाच्या नावावर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. २०१४ मध्ये, तिने युरोपमधील ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप, २०१६ मध्ये ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप मंगोलिया, २०१८ मध्ये अंडर २३ वर्ल्ड चॅम्पियनशिप रोमानिया इत्यादींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

नैनाचे वडील रामकरणने प्रसारमाध्यमांना सांगितले की, घटनेच्या वेळी नैना फ्लॅटमध्ये एकटीच होती. त्यांची मुलगी पूर्णपणे निर्दोष आहे. तिच्याकडे बेकायदेशीर शस्त्रे असल्याचा आरोपही खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. सुमित नंदलपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस तिच्या घरी पोहोचले होते पण त्यांनी नैनाला लक्ष्य केले, असे त्यांनी सांगितले.

नैना कंवल ही एक इंस्टाग्राम मॉडेल देखील आहे. सोशल मीडिया वेबसाइटवर तिचे २.५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे एक फॅन पेज देखील आहे ज्याचे ३१००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

नैना कंवलने तिच्या जिममधील वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ती तिचे ऍब्सही फ्लॉन्ट करते. सध्या राजस्थान पोलिस डिपार्मेंटने तिला निलंबित केले आहे.

Next Story