Janmarathi

Kissing Video: मुली-महिलांना पाहताच चुंबन घेतो हा तरूण, सीरियल किसरची दहशत....पाहा व्हिडिओ !

Kissing Video: मुली-महिलांना पाहताच चुंबन घेतो हा तरूण, सीरियल किसरची दहशत....पाहा व्हिडिओ !
X

Kissing Video: मुली-महिलांना पाहताच चुंबन घेतो हा तरूण, सीरियल किसरची दहशत....पाहा व्हिडिओ !

आपण आतापर्यंत अनेकदा सीरियल किलर्सच्या घटने बदल खूप ऐकलं असेल, पण सध्या एका व्हिडिओमुळे मुली आणि महिलांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. हा सीरियल किसर एक तरुण आहे, जो अचानक पाठीमागून येतो आणि अनोळखी महिला आणि मुलींचे चुंबन घेऊन पळून जातो.

मीडिया रिपोर्ट नुसार, हि घटना बिहार मध्ये घडली आहे. बिहार राज्यातील जमुई येथील एका सीसीटीव्ही फुटेजमधून हे संपूर्ण प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एका हॉस्पिटलच्या आवारात एक महिला मोबाइलवर कोणाशी तरी बोलत असताना, एक तरुण अचानक महिलेच्या पाठीमागून आला आणि महिलेला काही कळायच्या आत त्याने जबरदस्तीने महिलेचे चुंबन घेतलं. अचानक एखादा तरूण येऊन आपल्या ओठांचं चुंबन घेईल ही गोष्ट तिच्या स्वप्नात देखील आली नसेल. त्यामुळे या संपूर्ण घटनेने काही क्षण महिलाही स्थब्द झाली. महिलेला काही समजेपर्यंत आरोपी तरूणाने तेथून पळही काढला.

दरम्यान, या तरुणाचे संपूर्ण कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. महिलेचे चुंबन घेऊन तरुण तेथून फरार झाला. मात्र, हा व्हिडीओ पहिल्या नंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या व्हिडीओनंतर आता पुन्हा एकदा बिहारमधील महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह ऐरणीवर आला आहे.

इतकंच नाही तर घटनेला ७२ तासांहून अधिक काळ लोटला तरी जमुई पोलीस या सीरियल किसरविरोधात कोणतीही कारवाई करू शकलेले नाही. ही घटना घडून तीन दिवस झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. ही महिला जमुईच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. रुग्णालयाच्या चार भिंती ओलांडून एक तरूण आत आला आणि त्याने महिला आरोग्य सेविकेसोबत अश्लील वर्तन केलं. याप्रकरणी महिलेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणी जमुई पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र आरोपी तरूणाचा शोध अद्यापही पोलिसांना लागू शकलेला नाही.

Next Story