Janmarathi

Video: होळीच्या नावावर विदेशी महिले सोबत केली छेडछाड, जबरदस्तीने रंग लावून डोक्यात अंडे फोडले......पाहा व्हिडिओ !

Video: होळीच्या नावावर विदेशी महिले सोबत केली छेडछाड, जबरदस्तीने रंग लावून डोक्यात अंडे फोडले......पाहा व्हिडिओ !
X

Video: होळीच्या नावावर विदेशी महिले सोबत केली छेडछाड, जबरदस्तीने रंग लावून डोक्यात अंडे फोडले......पाहा व्हिडिओ !

संपूर्ण देशात ८ मार्चला मोठ्या उत्सहात होळी साजरी करण्यात आली. काही ठिकाणी शांततेत होळीचा सण साजरा करण्यात आला तर काही ठिकाणी विदेशी महिला सोबत गैरप्रकार घडले. सध्या सोशल मीडिया वर एक व्हिडिओ जोरदार वायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये एका जपानी महिले सोबत काही युवक छेडछाड करत असताना दिसत आहेत. एकाने तिला पकडून ठेवले आणि दुसरे दोघेजण या महिलेला रंग लावून तिच्या डोक्यात अंडे फोडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ दिल्ली येथील आहे.

या व्हिडिओ मध्ये असे दिसत आहे कि, या युवकांनी तिला मारहाण देखील केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया वर वायरल झाल्यानंतर यूजरनी संताप व्यक्त केला आहे. या विदेशी महिलेने देखील पोलिसात जाऊन कारवाई केली आहे. व्हिडिओ सोशल मीडिया वर वायरल झाल्यानंतर लोकांनी दिल्ली पोलीस आणि राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घ्यावी अशी प्रतिक्रया दिली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार,या विडिओ मधील युवकावर वर अजून कुठलीही कारवाई झालेली नाही.

Next Story