Viral Video: १२वी च्या परिक्षेला बसलेल्या लेकाला कॉपी द्यायला गेला बापा; पोलिसांचा काठीने चोप....पाहा व्हिडिओ !

Viral Video: १२वी च्या परिक्षेला बसलेल्या लेकाला कॉपी द्यायला गेला बापा; पोलिसांचा काठीने चोप....पाहा व्हिडिओ !
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातुन एक घटना समोर आली असून आपल्या मुलाला परिक्षेसाठी कॉपी देण्यासाठी गेलेल्या बापाला पोलिसांनी चांगलाच चोप दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जळगाव येथील एका १२वी च्या परीक्षा सेंटर वर ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
१२ वी च्या परिक्षेला बसलेल्या लेकाला कॉपी द्यायला गेलेल्या बापाला पोलिसांनी दिला चोप, जळगाव येथील घटना#ViralVideo #SakalNews #Exams pic.twitter.com/KMoM24hz6N
— SakalMedia (@SakalMediaNews) March 4, 2023
व्हायरल झाल्येल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला दोन पोलीस कॉन्स्टेबल काठीने बेदम मारहाण करताना दिसत आहेत. त्याचबरोबर या मारहाणीमध्ये सदर व्यक्ती जखमी झाला असून तो खाली पडल्यानंतरही त्याला पोलिसांकडून मारहाण केली जात असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सध्या १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षा सुरू असून राज्यभर या परिक्षेसाठी पळापळ सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी बुलढाणा येथे बारावीच्या गणिताचा पेपर फुटला होता. त्यामुळे प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला होता. तर परिक्षार्थींना कॉपी देणाऱ्यांना पोलिसांकडून अशा प्रकारचा चोप दिला जात आहे.