Janmarathi

15 August Essay in Marathi ; 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण

15 August Essay in Marathi ; 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण आणि क्रांती ज्योत प्रज्वलित झालेला दिवस

15 August Essay in Marathi
X

15 August Essay in Marathi ; 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण


(15 August Essay in Marathi) ; 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण


15 August 1947 Day Essay In Marathi ; 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भारतीयांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस


15 August Essay in Marathi ; 15 ऑगस्ट क्रांती ज्योत प्रज्वलित झालेला दिवस


  • प्रस्तावना :

भारताचे राष्ट्रीय सण म्हणून ओळखले जाणारे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या विषयी लिहिलेले हे निबंध वि
द्या
र्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शालेय अभ्यासक्रमातील निबंधासाठी हे सातत्याने विचारले जाणारे निबंध आहे. (15 August Independence Day Essay In Marathi, 26 January Nibandh In Marathi)

  • निबंध १


15 August Essay in Marathi ; 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण


(15 August 1947 Nibandh In Marathi)
भारताला इंग्रजांच्या कैदेतून मुक्ती मिळालेला दिवस 15 ऑगस्ट 1947 (National Holidays in India). अखंड
भारतात एक दिलाने आणि एक मनाने साजरा केला जातो. या दिवशी खरंतर या राष्ट्रीय सणानिमित्त जाहीर सुट्टी असते मात्र, अनेक शाळा, महाविद्यालये, कार्यालये, संस्था स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करतात. वेगवेग्ळ्या स्पर्धांच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाविषयी विध्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते. आमच्या शाळॆत शिक्षक दिनविशेष म्हणून कविता किंवा भाषणे सादर करायला सांगतात. पारतंत्र्याच्या अंधार भेदून स्वातंत्र्याचा उगवलेला सूर्य आज आपण आनंदाने पहात असलो तरी त्यापाठी अनेकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आहे. भारताचा हा राष्ट्रीय सण दिल्लीतील लाल किल्ल्यावरून प्रामुख्याने आयोजित केला जातो. आपल्या राष्ट्राचा तिरंगी राष्ट्रध्वज देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान सैन्य दल, वायू दल, नौदल, यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत फडकावला जातो. देशातील अन्य मान्यवर मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित असतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, यांच्या सारख्या अनेक दिग्गज स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःचे बलिदान दिले.
(15 august independence Day Essay In Marathi)

इ.स. 1770 पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. एकोणिसाव्या शतकापासूनच भारतावर सैन्यबळावर ठेवले होते. याचा परिणाम म्हणून भारतीयांनी 1857 चा उठाव केला पण तो सफल झाला नाही. मात्र इंग्रजांच्या निष्ठुरपणा पाहून भारतीयांच्या मनातील राष्ट्रभक्ती जागी झाली आणि टप्पाटप्याने स्वातंत्र्य जवळ येत गेले. असा हा मुक्ती संग्राम स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमूद न केल्यास पूर्ण होत नाही. या विद्रोहाला त्यांनी स्वातंत्र्य उठाव असे नाव दिले.
(15 August 1947 Day Essay In Marathi)

दीडशे वर्ष आपण अतोनात हालअपेष्टा सहन केल्या. भारताचा पारंपरिक इतिहास, पराक्रम आणि स्वाभिमान खोडून काढत स्वतःच्या फायदा वाढवतील अशा पद्धती, नियम आणि परंपरा बनविल्या. भारतात शिक्षणाचा प्रसार केला परंतु तेही भारतीय तरुणांना पोटभरू कारकून बनविणे एवढाच स्वार्थ ठेवून. मऊ तलम कापडाचे आकर्षण निर्माण करून भारतीय शेतकऱ्यांची फसवणूक केली. स्वतःच्या चहाच्या मळ्यांची भरभराट व्हावी म्हणून भारतीयांना चहाचे व्यसन लावले. निळीचे उत्पादन करण्याची सक्ती केली. भारतातील कच्चा माल स्वस्तात विकत घेऊन परदेशात उत्पादन केले आणि भारतीय बाजारपेठेत तो विकला. हवालदिल झालेले शेतकरी जमिनीवर कर्जे घेऊन कर्जबाजारी झाली. कित्येकांनी जमिनी विकल्या. अशा प्रकारे इंग्रजांनी ऐन दुष्काळाच्या वेळीही काही उपायोजना केली नाही. भारतीयांचे ब्रिटिशांनी खूप हाल केले.
(
15 August 1947 Nibandh In Marathi)
इंग्रजांचा हा धुर्तपणा तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मी बाई, नाना साहेब पेशवे, वासुदेव बळवंत फडके, क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू इ. क्रांतिकारकांनी ओळखला. त्यावर त्यांनी शस्त्रात्र निषेध नोंदविला. काहींनी इंग्रजांची हत्या केली तर काहींना इंग्रजांनी फाशी दिली. रानडे, गोखले, टिळक, आगरकर यांनी लेखणी हातात घेतली. त्यांनी वाणीचा आणि लेखणीचा वापर करून इंग्रजांकडून होणारा अन्याय आणि जुलूम याची जनतेला जाणीव करून दिली. महात्मा फुले यांनी अस्पृश्यता आणि स्त्री शिक्षणसाठी प्रयत्न केले. भारतीय जनतेला कळलेले स्वातंत्र्य मागून मिळणार नाही तर त्यासाठी लढा देण्याची गरज आहे आणि इंग्रज सरकारला जाब विचारण्याची गरज आहे. अनेक क्रांतिकारक तरुणांची प्रेरणा बनले जे आजही आम्हाला आवडतात. टिळक आणि सावरकरांनी आपली उमेदीची वर्षेच तुरुंगात घालवली. त्यानंतर महात्मा गांधीजींच्याकडे देशाचे नेतृत्व आले. महात्मा गांधीजींनी जनतेला सत्याग्रह आणि अहिंसा या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. टिळक आणि सावरकरांनी आपली उमेदीची वर्षेच तुरुंगात घालवली. त्यानंतर महात्मा गांधीजींच्याकडे देशाचे नेतृत्व आले. महात्मा गांधीजींनी जनतेला सत्याग्रह आणि अहिंसा या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. त्या आधारे आपण भारतीयांनी अशक्य अशी लढाई एकजुटीने लढून शक्य करून दाखविली.

"बंदिवानही भारतमाता आज फोडीते टाहो, मातेच्या स्वातंत्र्याला घरदार सोडूनि याहो"
या गगनभेदी नाऱ्याने पारतंत्रांचे कंबरडे मोडले. (Independence Day Essay In Marathi) ; 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण

  • निबंध २


26 January Nibandh In Marathi इतिहासातील वीरांची आठवण करून देणारा गणतंत्र दिवस 26 जानेवारी


26 January Nibandh In Marathiप्रजासत्ताकदिन आणि स्वातंत्र्यादिन हे भारताच्या इतिहासातील दोन महत्त्वाचे दिवस आहेत. जे आजही मोठ्या थाटाने आणि सन्मानाने साजरे केले जातात. 26 जानेवारी 1950 रोजी भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले आणि आपल्या देशाला संविधान प्राप्त झाले. प्रजासत्ताक दिनाचा इतिहास मोठा आहे. साधारण 1929 मध्ये झालेल्या लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनापासून याची सुरुवात होते. या अधिवेशनाचे पं. नेहरू अध्यक्ष होते. भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव यात पास करण्यात आला. याच दिवशी मध्यरात्री बारा वाजता रावी नदीच्या तटावर पंडित नेहरूंनी स्वातंत्र्याचा ध्वज फडकविला. संपूर्ण भारत देशाला आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाल्याची जाहीर घोषण केली. हाच तो दिवस. त्यादिवशी सर्व लोक प्रतिनिधींनी एका सुरात भारतमातेला गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली. अशा तऱ्हेने हा दिवस अविस्मरणीय ठरला. दरवर्षी 26 जानेवारीला भारतीय जनता या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करते. 1942 मध्ये 'भारत छोडो' चळवळीमुळे इंग्रजांना भारत सोडावा लागला. स्वातंत्र्य चळवळीला उत्तेजन व गती मिळाल्याने त्याचे झंझावात रूपांतर झाले. देशाची घटना निर्मितीची सुरू झालेली प्रक्रिया 26 जानेवारी 1950 रोजी पूर्ण झाली. त्यानंतर भारत प्रजासत्ताक देश बनला. त्याला सार्वभौमत्व मिळाले. लोकशाही शासनपद्धतीचा स्वीकार केला आणि . भारत वासियांमध्ये प्रसन्नता संपूर्ण स्वातंत्र्याची लाट पसरली. 26 जानेवारी राष्ट्रीय सण म्हणून ओळखला जाऊ लागला.

या दिवशी सर्वप्रथम पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन अनाम हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात.राष्ट्रीय ऐक्य, संस्कृती, इतिहास आणि समृद्धीचे दर्शन घडते. प्रादेशिक लोकनृत्ये सादर केली जातात. हा मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम हजारो लोक त्या ठिकाणी आणि टीव्हीवर आवर्जून पाहतात.

  • निष्कर्ष

Independence Day Essay In Marathi, 26 January Nibandh In Marathi
15 ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे भारताचे राष्ट्र्रीय सण आहेत. याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यासंदर्भात माहिती देणारे हे निबंध विध्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत. राष्ट्रीय सणावरील निबंध कसे वाटले याबाबत
independence Day Essay In Marathi
, 15 August Nibandh In Marathi, Rashtriy San Nibandh In Marathi आपली प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

  • हे पण वाचा

Next Story