Janmarathi

Aai Essay In Marathi ; आई संपावर गेली तर काय होईल?...

Aai Essay In Marathi ; आईचे स्थान हे आपल्या आयुष्यात अनन्य साधारण आहे. लहानपणापासून जी आपल्याला घडवते, चालायला शिकवते अशी आई आपल्या आयुष्यातील पहिला गुरु आहे. अशी आई जर संपावर गेली ती काय होईल याचा विचार करून पहिलं नकीच धक्का बसेल. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही उक्ती अजिबात चुकीची नाही. आईचे प्रेम आणि माया अथांग आहे. त्यामुळे आईचे आपल्यावर थोर उपकार आहे.

Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi ; आई संपावर गेली तर काय होईल?...
X

Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi ; आई संपावर गेली तर काय होईल?...

Aai Essay In Marathi ; आपल्या आयुष्यातील आईचे अनन्य साधारण महत्त्व

Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi ; आई संपावर गेली तर काय होईल?...

Aai Maza Guru Essay In Marathi ; माझ्या आयुष्यातील प्रथम गुरु माझी आई

प्रस्तावना (Aai Essay In Marathi, Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi)
आईचे स्थान हे आपल्या आयुष्यात अनन्य साधारण आहे. लहानपणापासून जी आपल्याला घडवते, चालायला शिकवते अशी आई आपल्या आयुष्यातील पहिला गुरु आहे. अशी आई जर संपावर गेली ती काय होईल याचा विचार करून पहिलं नकीच धक्का बसेल. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही उक्ती अजिबात चुकीची नाही. आईचे प्रेम आणि माया अथांग आहे. त्यामुळे आईचे आपल्यावर थोर उपकार आहे.
(Aai Essay In Marathi)


निबंध १

Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi ; आई संपावर गेली तर काय होईल?...
आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही
म्हणूनच श्रीकारानंतर शिकणे अ आ ई... (Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi)

आई या अक्षरांमध्ये सगळं काही सामावलं आहे. आनंदाच्या क्षणी पहिली आठवण आईची होते. दुःखात असताना 'आई गं... अशी कळवळीची हाक न चुकता येते. अशी आपले सर्वस्व असलेली आपल्या आसपास नसली तर काय होईल?... आणि महत्त्वाचे म्हणजे आई संपावर गेली तर काय होईल?... नुसत्या विचारानेच घाबरगुंडी उडाली नाही का!... खरंतर आई आसपास असणे म्हणजे आम्हा मुलांसाठी सतत काही तरी होत असल्याचा अनुभव असतो. सुईचे काटे आणि आणि आईची हाक न चुकता आणि न विसरता प्रत्येक गोष्टीची आठवण करून देत असते. आमच्या शाळा, अभ्यास, प्रॉजेक्ट, परीक्षा, रोजच्या वेळा सगळं काही नियमित लक्षात ठेवते. बाबा देखील काही अंशी आईवरच अवलंबून असतात. या गोष्टींची इतकी सवय झाली आहे की, आई अचानक संपावर गेली तर आम्हा सगळ्यांची दिनचर्या विस्कळीत होणार हे नक्की. बरं संपावर जाणारी माणसं ही कामगार असतात, कोणत्यातरी कंपनीत कामाला असतात. आईने घरात असताना तिने संपांवर का जावं? हा प्रश्न मला नेहमी सतावतो. मात्र बाबा रोज सकाळी कामावर जातात संध्याकाळी घरी येतात. आई तर दिवसभर घरीच असते आणि माझा जवळचा मित्र यशची आई कामावर सुद्धा जाते. मग आई किती काम करते याचाही विचार करायला हवा. रात्रीची झोप वगळता आईला कोणत्या ना कोणत्या कामात पाहिलं आहे. तिच्या कामाची ठरलेली वेळच नाही. असा विचार सगळ्या आईंच्या मनात आला आणि सगळ्या आई संपावर गेल्या तर काय होईल याचा विचार करून माझा तर थरकापच उडतोय. आईची आपल्याला पावलोपावली गरज लागते म्हणून ती आपल्याला हवी असते का? तिची सवय लागली आहे म्हणून कि आपला जगणं सुकर व्हावं म्हणून आई हवी असते. त्यामुळे आई संपावर गेली तर ज्यांना आईची किंमत नाही अशा लोकांना तिची किंमत कळेल. आई ही प्रत्येक घरातील आत्माच असते. तिच्याशिवाय घराची कल्पना करणे अशक्य आहे. आई संपावर काय दोन दिवस गावी गेली तरी आम्ही मुले कासावीस होतो. घरात अभ्यासात लक्ष लागत नाही. आईचा धाक नको किंवा ओरडा नको म्हणून अनेक क्लुप्त्या लढवणारे आम्ही घरातील सगळे आईच्या संपाबाबत असहमत आहोत. आईची अभ्यासामागील कटकट कधी संपणार?, परीक्षेत कमी मार्क्स मिळाले म्हणून पहिला प्रसाद आईकडून मिळू नये भन्नाट आयडिया लढवणारी आम्ही मुले आईशिवाय नेहमीच अपूर्ण आहोत. ज्या मुलाची आई नाही त्यांचे आभाळ इतके दुःख किती मोठे असेल याची जणीव या संपामुळे झाली.
(
Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi)


निबंध २

Aai Maza Guru Essay In Marathi ; माझ्या आयुष्यातील प्रथम गुरु माझी आई
(Aai Maza Guru Essay In Marathi) गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृती मधील अतिशय जुनी परंपरा आहे. अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या आणि त्यांचा लौकिक आजही अणे सहत्र वर्षानंतर टिकून आहे आणि त्याचे दाखले दिले जातात. द्रोणाचार्य-अर्जुन, चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य, दादाभाई नौरोजी-महात्मा गांधी, रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद अशा अनेक जोड्यांची नावे आवर्जून सांगता येतील. मात्र असा एक गुरु आपल्या अवती भोवती असतो ज्याचे पावलोपावली आपल्यावर लक्ष असते. मुलांच्या चांगल्या वाईट गोष्टींची जाण असते. मुलांना हानी पोहोचू नये म्हणून हा गुरु आपल्या आयुष्यात आई या नात्याने नेहमी राहतो. लहान असताना आपण आईचं सगळं ऐकतो ती म्हणेल तसं करतो त्यामुळे कोणत्याही अडचणीत सापडत नाही. चुकीचे काम करत नाही. पण मोठे झाल्यावर स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागतो. आईचे म्हणणे नजरे आड करतो. आईच आपल्या आयुष्यातील पहिला गुरु आहे तिने आपल्याला लिहायला, वाचायला, चाली रीती शिकवते समाजात वावरण्या लायक बनविते मात्र आजही अनेक जण आपल्या आईचा गुरु म्हणून उल्लेख करत नाही. मात्र हे त्रिवार सत्य आहे आईच हा माणसाच्या आयुष्यातील पहिला गुरु असते. अनेक कविता लेखातून आईची महती सांगितली आहे. त्यामुळे आम्हा मुलांची कधीही उलट उत्तरे, आईचे न ऐकण्याचे धाडस होत नाही. मात्र आजची परिस्थिती पाहता अनेक अनाथ आश्रम निर्माण झाली आहे. अनेक आई बाबा त्यात पहायला मिळतात. हि परिस्थिती का ओढवली आहे याचा विचार व्हायला हवा. अनेक वेळा आईला फार माहिती किंवा शिक्षण नसते मात्र आयुष्यात तिने अनेक कठीण परीक्षा दिल्या असतात. ज्याचा अनुभव तिच्याकडे असतो. त्यामुळे हि नेहमीच गुरु स्थानी असते.
(Aai Essay In Marathi)


निष्कर्ष (Aai Essay In Marathi)

आईची महती आणि तिचे अस्थित्व आपल्या आयुष्यातून कधीही कमी होणार नाही. तिची गैरहजेरी प्रत्येकाच्या अआयुष्यात मोठी न भरून निघणारी पोकळी निर्माण करणारी आहे. त्यामुळे या विषयावरील निबंध कसे वाटले याबाबत नक्की प्रतिक्रिया कळवा. Aai Essay In Marathi, Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi, Aai Maza Guru Essay In Marathi, Aai Baba Essay In Marathi
Next Story