Janmarathi

Christmas Essay In Marathi ; जगभर साजरा केला जाणारा ख्रिस्ती धर्मियांचा पवित्र नाताळ सण

Christmas Essay In Marathi ; हा सांताक्लॉज म्हणजे नाताळ बाबा रात्री गुपचूप कुठून येतो, का येतो, वर्षातून एकदाच का येतो किंवा तो मुलांनाच का भेटवस्तू देतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा निबंध

Christmas Essay In Marathi
X

Christmas Essay In Marathi ; परिकथेच्या जगाची सफर घडवणारा माझा आवडता नाताळ सण

प्रस्तावना : (Christmas Essay In Marathi)

Christmas Essay In Marathi ; परिकथेच्या जगाची सफर घडवणारा माझा आवडता नाताळ सण वर्षाचा समारोप करणारा सण म्हणजे नाताळ म्हणजेच ख्रिसमस. ख्रिस्ती धर्मियांचा सगळ्यात मोठा सण म्हणजे नाताळ. या सणाची ते आतुरतेने वाट पाहत असतात. ज्याप्रमाणे दसरा आणि दीपावलीचा सणाचे अनन्य साधारण महत्त्व आहे तसे नाताळचे देखील ख्रिती बांधवांसाठी महत्त्व आहे. नाताळ सणाचे लहान मुलांमध्ये विशेष आकर्षण आहे . हा सांताक्लॉज म्हणजे नाताळ बाबा रात्री गुपचूप कुठून येतो, का येतो, वर्षातून एकदाच का येतो किंवा तो मुलांनाच का भेटवस्तू देतो असे अनेक प्रश्न आम्हा मुलांना पडत असतात. या संकल्पने विषयी माहिती देणारा निबंध. (Christmas Nibandh In Marathi,Santa Claus story In Marathi, Santa Claus Essay In Marathi)

Christmas Essay In Marathi ; वर्षातून एकदा लहानग्यांचा आवडता सांताक्लॉज ला भेटण्याची संधी देणारा नाताळ सण

Christmas festival essay in Marathi ; जगभर साजरा केला जाणारा ख्रिस्ती धर्मियांचा पवित्र नाताळ सण

भारतात जितक्या विविध धर्मियांचे बांधव राहतात तितक्याच त्यांच्या संस्कृती आणि परंपरा देखील वास्तव्याला आहेत. दिवाळी, ईद, पतेती याप्रमाणे ख्रिसमस भारतातील ख्रिस्ती संस्कृतीचे प्रतीक आहे. दरवर्षी नियमाने २५ डिसेंबरला येणारा नाताळ सण येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस म्ह्णून साजरा केला जातो. याच दिवशी जगातील दयाळु, गरिबांचा सेवक येशूचा जन्म झाला होता. जगात ते मसीह (मृतांना जीवन देणारा) म्हणून प्रसिद्ध झाले म्हणून त्यांना इसा मसीह म्हटले जाते. ख्रिस्ती धर्मियांचे प्रार्थनास्थळ चर्चमध्ये अनेक मोठ्या उत्साहाचे वातावरण असते. चमचमणारा आसमंत आणि फुललेल्या बाजारपेठेमुळे एक वेगळाच उत्साह या सणामुळे निर्माण होते. विशेष म्हणजे कडाक्याच्या थंडीच्या दिवसात हा सण आल्याने थंडीच्या रात्रीत नाताळचे जल्लोष पाहताना खूप मज्जा येते. नवीन कपडे, नव्या भेटवस्तू लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. या सणाचा आनंद साजरा करण्यासाठी अंगणात ख्रिसमसचा वृक्ष सजविला जातो. त्यावर चित्रे, फळे, फुळे, फुगे, खेळणी अडकविली जातात. चर्चची सजावट केली जाते.
(Christmas Essay In Marathi Wikipedia)
या सणाच्या दिवशी चर्चमध्ये विशेष स्तोत्रे आणि आनंद गीते गायली जातात. हा सण २५ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत चालतो. आपल्या प्रियजनांना मिठाई देणे, एकमेकांना शुभेच्छा देणे, प्रीतिभोजनाचे आयोजन केले जाते. रात्रीच्या रोषणाई मुळे वेगळेच चैतन्य वातावरणात निर्माण होते. ठिकठिकाणी येशू ख्रिस्ताच्या जन्माचा इतिहास उलगडणारी नाटक देखावे सादर केले जातात. त्यांनी दिलेला क्षमाशीलता आणि शांतीसंदेशचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणवर केला जाते. ख्रिसमसच्या रात्री सांताक्लॉजने कडून मिळणारी भेट आम्हा मुलांना खूप खुश करते (
Christmas Nibandh In
Marathi).

Christmas Essay In Marathi ; वर्षातून एकदा येणारा सांताक्लॉज आहे तर कोण?

ख्रिसमस हा सण आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि अमेरिका या पाच खंडांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यातील विशेष म्हणजे युरोप हिवाळ्यात दिवस संध्याकाळी पाच वाजेच्या आत मावळतो. सर्वत्र बर्फ साठल्याने लोकांना घराबाहेर अशक्य होते. परिणामी अशा गोठवणाऱ्या थंडीत येथील लोक शेकोटी पेटवून, एका लाकडी दांडय़ाची मशाल बनवून दिव्याची सोय करून कामे करत.
सग्या-सोयऱ्यांसोबत आनंदाने
स्नेहभोजन, नाच गाण्याचा आनंद घेतात. विशेष म्हणजे इ.स. चौथ्या शतकात बाळ येशूच्या जयंतीच्या रूपाने सांताक्लॉजची कल्पना रुजली, चालू झाली. तीच रूढी, परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे. (Christmas Essay In Marathi)
मात्र, अमेरिकेत या सणाची पद्धत नव्हती. युरोपियनांनी अमेरिकेत कायम स्वरूपी वस्ती केली आणि आपल्या परंपरा या ठिकाणी रुजविल्या. अमेरिकेत पहिल्यांदा प्रथम इ.स.१८७० मध्ये ख्रिसमसला राष्ट्रीय सुट्टी आणि सण म्हणून जाहीर करण्यात आले. खाऊ-खेळणीची दुकाने, रंगीबेरंगी दिवे, स्टार झळकले.'ख्रिसमस ट्री'ला ख्रिसमस काळात नटून थटवून त्याभोवती रोषणाई करून नाचायचे. कारण हेच एकमेव झाड आहे जे बर्फाच्छादित प्रदेशात हिरवे गार राहते. नाताळमध्ये येणार सॅन्टा पांढरी शुभ्र केसाळ दाढी असलेला, लालभडक झग्याला कापसासारखी किनार लावलेला, लांब शेंडीची ऐटीत टोपी घातलेला सांताक्लॉज येतो, उंच टाचांचे काळेकुट्ट बूट घालून हाती डौलदार काठी घेऊन, खाडखाड आवाज करत, डोळे मिचकावत, ओळख न दाखवत, येथे तेथे धावणारा हा ढेरपोटय़ा बाबा लहान-थोरांचे तो खास आकर्षण असतो.
(Santa Claus Essay In Marathi)
सांताक्लॉज हे नाव सहा डिसेंबरला येणाऱ्या संत निकोलस यांच्या सणाची आठवण करून देते. त्या दिवसापासून सांताक्लॉज गावभर फिरून बाळ येशूची पूर्वतयारी करू लागतो. सिंटर क्लास या डच नावावरून सॅन्टा क्लोज नाव तयार झाले. संत निकोलसचा कनवाळू, दयाळू, प्रेमळ, मनमिळाऊ स्वभाव होता. गोरगरीबांच्या बालकांचे परिवाराचे ते कैवारी होते. मुलांना विशेष करून गरजू आणि निराश्रित स्त्रियांना ते प्रेमाने समजून घ्यायचे. त्यांना काही तरी नेऊन द्यायचे. जनसामान्यांतली त्यांची प्रतिमा टिकविण्यासाठी आणि अजरामर होण्यासाठी थॉमस नॅस्ट या प्रसिद्ध चित्रकाराने पहिला सांताक्लॉज बनविताना फार मोठी मेहनत घेतली. प्रख्यात कवी क्लेमेंट मूर यांच्या कवितेतील सांताचे हुबेहूब चित्र त्यांनी पहिल्यांदा सन १८७० च्या काळात साकारलेला चित्राची लोक प्रियता सर्वत्र वाढली.
(Christmas Essay In Marathi Wikipedia)

निष्कर्ष : (Christmas Essay In Marathi)

वर्षाचा समारोप करणारा नाताळ सण अनेकांच्या आवडीचा आहे. ख्रिस्ती धर्मियांचा हा सण जगभरात साजरा केला जातो. लहान मुलांना आवडणारा नाताळ बाबा आणि त्याचा इतिहास या निबंधात मांडला आहे (Christmas Essay In Marathi, Christmas festival essay in Marathi, Christmas Essay In Marathi Wikipedia, Santa Claus Essay In Marathi, Christmas Nibandh in Marathi)

हे पण वाचा

Next Story