Janmarathi

Diwali Essay In Marathi ; लख लख तेजाची न्यारी दुनिया... नात्यांचा आणि उत्सवाचा सण म्हणजे दिवाळी

Diwali Nibandh In Marathi ; प्रत्येकाच्या आवडीचा आणि मन प्रफुल्लीत करणारा दिवाळी सण साजरा करूया पर्यावरण पूरक पद्धतीसोबत

Diwali Essay In Marathi
X

Diwali Essay In Marathi ; लख लख तेजाची न्यारी दुनिया... नात्यांचा आणि उत्सवाचा सण म्हणजे दिवाळी

Diwali Essay In Marathi ; लख लख तेजाची न्यारी दुनिया... नात्यांचा आणि उत्सवाचा सण म्हणजे दिवाळी

Diwali Nibandh In Marathi ; भारतीय संस्कृतीची शान असलेला दिवाळी सण

Diwali Nibandh In Marathi ; प्रत्येकाच्या आवडीचा आणि मन प्रफुल्लीत केलेला सण दिवाळी

  • प्रस्तावना : (Diwali Essay In Marathi, Diwali Par Nibandh In Marathi)

(Marathi Essay On Diwali) दिवाळी हा भारतीय संस्कृतीचे वेगवेगळ्या परंपरा दर्शवणारा, आनंदाचा, रोषणाईचा, उत्सवाचा सण आहे. दिवाळी हा सण सर्वांनाच आनंद देणारा असतो. दिवाळीच्या दिवसात घरापुढे सुंदर रांगोळ्या काढतात. यासारख्या अनेक गोष्टींचा आढावा या निबंधाच्या माध्यमातून घेणार आहोत.
(Essay On Diwali Vacation In Marathi)
उन्हाळ्याच्या सुटी आधी येणारी मोठी सुटी म्हणजे दिवाळीची त्यात केली जाणारी धमाल मस्ती मुलांना खूप आवडते. त्याच बरोबर दिवाळीचा उत्सव साजरा करताना वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण खूप प्रमाणात होते. (Diwali Pollution Essay In Marathi)

  • निबंध १

Diwali Nibandh In Marathi ; प्रत्येकाच्या आवडीचा आणि मन प्रफुल्लीत करणारा दिवाळी सण

(My Favourite Festival Diwali Essay In Marathi) भारत हा नेहमीच विविधेतेने नटलेला देश म्हणून समजला आहे. विविधतेत एकता जपणारा हा देश असा एक सण आहे जो मोठ्या आनंदाने आणि मनापासून साजरा जातो तो म्हणजे दिवाळीचा. महाभारतातील पौराणिक कथेनुसार 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आले आणि त्यांच्या प्रजेने जो काही उत्सव साजरा केला त्याच्या आठवणी म्हणून दिवाळी सण साजरा केला जातो. श्री राम हे एक अतिशय लोकप्रिय हिंदू देवता आहे जो आपल्या जे त्यांच्या पवित्रतेसाठी पूजनीय आहे. (Diwali Nibandh In Marathi)या क्षणाची भारतीय मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. अश्विन वदय त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे पाच दिवस दिवाळी असते.

अश्विन महिन्यात द्वादशीला" वसू भारत" सवत्स म्हणजे वासरासह गायीची पूजा केली जाते. नरकचतुर्थीला नरकासुराचा म्हणजे वाईट वृत्तीचा संहार केल्यामुळे करटे फोडून त्याचा घरोघरी प्रतिकात्मक वध केला जातो. अभ्यंगस्नानाचे देखील विशेष महत्व असते. उटणे लावून केलेली सुवासिक आंघोळ गंमतीशी असते. बलिप्रतिपदेला दानशूर बळीचा गुण गौरव केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक असल्याने कोणतेही नवे काम करण्यासाठी या दिवसाची आवर्जून लोक वाट पहातात. पती पत्नी मधील नाते साजरा करणारा पाडवा आणि दिवाळसणाचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज बहिण भावाच्या निर्मळ प्रेमाचे प्रतीक आहे.

(Essay On Diwali In Marathi) दिवाळी येण्यापूर्वी देखील असेच वातावरण आनंददायी घरोघरी निर्माण झालेले असते. दिवाळीची स्वच्छता, फराळ, फटाके, नवीन कपडे भेटवस्तू याची रेलचेल असते. आम्हा लहानमुलांचे दिवाळीत किल्ले बनविणे, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देणे असा दिनक्रम असतो. या दिवसात घरापुढे काढलेल्या सुंदर रांगोळ्या, उडविले जाणारे फुलबाजा, भुईचक्र, अनार असे फटाके पाहून इंद्रधनुष्य जमिनीवर अवतरले असा भास होतो. फटाक्यांबरोबर आम्हाला मिळणारे नवीन आणि छान कपडे, घरातील लाडू, करंज्या,चकल्या आणि मिठाईने हा भरलेले डबे पाहून आमची तर चंगळ होते. असा हा भरभराटीचा सुखाचा दिवाळी सण मला मनापासून खूप आवडतो. (Nibandh In Marathi Diwali, Diwali Festival Essay In Marathi, Diwali Essay In Marathi For Class 6)

  • निबंध २

Diwali Pollution Essay In Marathi ; यंदाची दिवाळी साजरी करूया पर्यावरण पूरक पद्धतीसोबत

(Eco Friendly Diwali Essay In Marathi) दिवाळी हा दिव्यांचा, रंगांचा आणि उत्साहाचा सण आहे. ज्याची आपण सगळेच उत्साहाने वर्षभर प्रतीक्षा करतो. आपल्या अवती भोवती असलेला परिसर यावेळी प्रामुख्याने स्वच्छ केला जातो. त्यात नवनवीन बदल आणि आकर्षक दिसण्यासाठी बरीच मेहनत घेतली जाते. या दिवसाचे हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व असल्याने लोकांमध्ये देखील उत्साह संचारलेला असतो. अनेक नवीन गोष्टींची सुरूवात करण्यासाठी दिवाळीतील बलिप्रतिप्रदा, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त राखून ठेवला जातो.(Pradushan Mukt Diwali Essay In Marathi) मात्र आपण सगळे आपल्या उत्साहात इतके मग्न झालेलो असतो की फटाक्यांमुळे होणारे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, त्यातून निघणाऱ्या कचऱ्यामुळे भौगोलिक प्रदूषण होत असल्याचा आपल्याला विसर पडत आहे. सणा निमित्त आम्ही मुले नवीन कपडे घेतो छान दिसतो मात्र सभोवतालचा परिसर आपण किती अस्वच्छ करत आहोत याचे आपल्याला भान नाही.

यंदा आम्ही मुलांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करायचे ठरविले आहे. फटाके फोडण्यापेक्षा वाचनीय आणि पुस्तकांची खरेदी, सोसायटीच्या आवारात निवडक झाडांचे वृक्षारोपण करणार आहोत. परंपरा आणि विधी या सणाला सुंदर बनवित असल्या तरीही होणाऱ्या प्रदूषणामुळे सणाला गालबोळ लागण्याची शक्यता असते. स्वतःचा आनंद लुटताना पर्यावरणाला हानी पोचते आणि आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. फटाक्यांद्वारे निघणार्‍या धुरामुळेश्वसनाचे रोग, बहिरेपणा बाल आणि वृद्धांमध्ये पहायला मिळतो. फटाके फोडल्यामुळे डोळ्यातील जळजळ, डोळे आणि त्वचेची लालसरपणा आणि फुफ्फुसाचा संसर्ग यासारख्या आरोग्याच्या इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रदूषण नव्हे तर आपण प्रेमरंग उधळूयात. आपण हा सण आपल्या प्रियजनांबरोबर दर्जेदार वेळ घालवून त्यांच्याशी संबंध जोडण्याची संधी म्हणून घेणे आवश्यक आहे.फटाके फोडून प्रदूषणात भर घालण्यापेक्षा अधिक आनंददायक असू शकते. (Pollution Free Diwali Essay In Marathi, Diwali Essay In Marathi For Class 7)

  • निबंध ३

Essay On Diwali Vacation In Marathi ; अशी साजरी केली दिवाळीची सुट्टी अविस्मरणीय पद्धतीने

How We Celebrate Diwali Essay In Marathi दिवाळीसण जवळ येताच आम्हा मुलांना वेध लागतात दिवाळीच्या सुट्ट्यांचे. शाळेतील मित्रमैत्रिणी, घरातील भावंडे सगळे मिळून या दिवसांचा पुरेपूर वापर कसा होईल याकडे लक्ष देतो. घरी राहून फराळ खाणे, फटाके फोडणे, नातेवाईकांना भेटी देणे यापेक्षा काही वेगळे करण्यावर माझा भर आहे. त्यामुळे यंदा आम्ही दिवाळीच्या सुट्टीत एक अनोखा उपक्रम करण्याचे ठरवतो हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी माझे चुलत भाऊ-बहिणी एकत्र जमतात म्हणून ते माझ्या घरी एकत्र जमतात. यंदा आम्ही गरीब लोकांना मदत करण्याचे ठरविले आणि म्हणून त्यांना विनामूल्य फराळ आणि नवीन कपडे दिले. त्यातून मला खूप आनंद मिळाला. तसेच वायू प्रदूषण कमी करण्यासाठी फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जात असल्याने आम्ही आपले घर दिवे लावून सजवितो.Essay In Marathi On Diwali, Essay On Diwali In Marathi For Class 8

  • निष्कर्ष : (Maza Aavadta San Diwali Nibandh In Marathi)

चोहीकडे रोषणाई, आनंद आणि दिव्यांची आरास पाहून मनाला प्रसन्न करणारा सण दिवाळी आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. या सणाबाबच्या विशेष गोष्टी या निबंधात नमूद केल्या आहेत. तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे नक्की कळवा आपल्या कमेंटच्या माध्यमातून. Essay On Diwali Festival In Marathi Language, Nibandh In Marathi Diwali, How We Celebrate Diwali Essay In Marathi, Pollution Free Diwali Essay In Marathi, Pradushan Mukt Diwali Essay In Marathi, Eco Friendly Diwali Essay In Marathi, Diwali Essay In Marathi For Class 5, Diwali Essay In Marathi For Class 6, Diwali Essay In Marathi For Class 7, Essay On Diwali In Marathi For Class 8

  • हे पण वाचा

Essay On Navratri In Marathi

Rainwater Harvesting Essay In Marathi

Eassy On Rainy Season In Marathi

Next Story