Janmarathi

Essay on Rainy Season in Marathi: पावसाळावरती निबंध Essay On First Rain in Marathi

Essay on Rainy Season in Marathi: शालेय मुलांसाठी पावसाळावरती निबंध. Essay on first rain in Marathi. Paus Nibhand In Marathi

Essay on Rainy Season in Marathi: शालेय मुलांसाठी पावसाळावरती निबंध. Essay on first rain in Marathi. Paus Nibhand In Marathi
X

Essay on Rainy Season in Marathi ; मौज मजा आणि निसर्गरम्य वातावरणाची सफर घडवणारा पावसाळा

Essay on Rainy Season in Marathi ; मौज मजा आणि निसर्गरम्य वातावरणाची सफर घडवणारा पावसाळा

प्रस्तावना :

सध्या पाऊस परतीच्या वाटेवर लागला असला तरीही पाऊसाची सर ही आपल्याला नेहमीच सुखावून जाणारी असते. तापलेल्या सूर्यामुळे शरीराची लाहीलाही कमी करणारा हा पाऊस प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो. अशा पावसाचे वर्णन खालील निबंधातून केले आहे. त्यानिमित्त (Essay on Rainy Season in Marathi) पावसाळावरती निबंध उपलब्ध केले आहेत. पावसाळ्यातील पहिला पाऊस ( essay on first rain in Marathi )

Essay on Rainy Season in Marathi: शालेय मुलांसाठी पावसाळावरती निबंध. Essay on first rain in Marathi. Paus Nibhand In Marathi

  • निबंध १: मौज मजा आणि निसर्गरम्य वातावरणाची सफर घडवणारा पावसाळा (Essay on Rainy Season in Marathi)

भारत देश हा नेहमीच वैविध्यपूर्ण गोष्टीसाठी ओळखला जातो. त्यातील एक म्हणजे येथील ऋतुचक्र. भौगोलिक समृध्दीमुळे भारतात तीन ऋतू पाहायला मिळतात. उन्हाळा, पावसाळा, व हिवाळा या ऋतुचक्रामुळे आपले जीवमान देखील विभागले आहे. मात्र भारतात पावसाळा हा ऋतू प्रामुख्याने पसंत केला जातो. या ऋतूत खूप पाऊस पडतो. रिमझिम पावसात नाचायला बागडायला लहानांनपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. पावसाच्या पाण्यात खेळण्याचा सगळे आनंद घेतात. (
Essay on Rainy Season in Marathi ; पावसाळावरती निबंध)
पावसात तयार होणारी छोटी छोटी तळी लहानमुलांचे खास आकर्षण असतात. माणसाच्या आयुष्यात जसे पाण्याला खूप महत्व आहे तसे पावसाळ्याला देखील आहे. उन्हामुळे सुकलेली धरती हिरवी गार होते. रिकामे झालेले धरण तलाव पाण्याने पुन्हा तुडुंब होतात. पावसाळ्यात अनेक पर्यटन स्थळांना नयनरम्य स्वरूप प्राप्त होते. ओसंडून वाहणारे धबधबे, नद्या पाहण्यासाठी पर्यटक लांबून तसेच आवर्जून अशा स्थळांना भेटी देतात.विशेष म्हणजे भारताची शान म्हणून ओळखले जाणारे शेतकरी बांधव यांच्यासाठी पावसाळा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी केलेल्या पेरणीला पाणी याच पावसामुळे मिळते. पहिल्यांदा पडलेल्या पावसामुळे येणारा मातीचा मनमोहक सुगंध अनेकांना मोहून टाकतो.मात्र कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पाऊस फारसा आवडताना दिसत नाही. पावसामुळे होणारा उशीर, वाहतूक बंद किंवा रखडणे, त्यामुळे ऑफिसला होणारा उशीर काही जणांना आवडत नाही. अचानक आलेल्या पावसामुळे देखील अनेकांची तारांबळ उडते.
आम्ही शाळकरी मुले मात्र पावसाळा चालू झाला की वेगळ्याच खुशीत असतो, धुव्वादार पडणारा पाऊस, आईने केलेले गरमागरम बेत, शाळेला अचानक मिळणारी सुट्टी आणि बरच काही आम्ही मुलं अनुभवतो. आजारी पडू नये म्हणून आईचा ओरडा देखील खातो. आम्हा मुलांच्या पावसावरील गाण्यांची अंताक्षरी सुरु होते.
"तू येरे येरे पावसा तुला देतो पैसा!" "पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा!"

  • निबंध २: वातावरणातील अतुलनीय बदल दाखवणारा पावसाळा (Essay on Rainy Season in Marathi)

''हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणाच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवर फुलराणी ही खेळात होती''...
(Essay on Rainy Season in Marathi ; पावसाळावरती निबंध)
चातक पक्षासारखी पावसाची वाट पाहणारे आपण सगळे मे महिन्याला काहीसे कंटाळलेले असतो. ग्रीष्म ऋतूमुळे तापलेली धरणी आकाशाकडे देखील मोठ्या आशेने पाहत असते. अशातच बरसलेला वरुण राजा आपलाच काय निसर्गाचा देखील सगळं क्षीण लगेच काढून टाकतो. बरसलेल्या टपोऱ्या थेंबातील मजा घेण्यासाठी सगळेच आसुसलेले असतात. हिरवागार झालेला निसर्गचे रूप अतिशय सुंदर दिसते. विजांमुळे होणार कडकडाट एक क्षण हृदयाचा ठोका चुकवणार असतो. कडकड पडणारी वीज मनाचा थरकाप उडवते. आम्हा मुलांना याची खरंतर मजा आणि भिती दोन्ही वाटते. मग आईने सांगितलेली लहानपणीची गोष्ट आठवते, ''बाहेर जाऊ नकोस म्हातारी आकाशात हरभरे भरडतेय म्हणून आवाज होतोय'' ते आठवलं की, आम्ही भावंडं खो-खो हसतो.रिमझिम पडणारा पाऊस, वातावरणात निर्माण झालेला गारवा चटपटीत भजी किंवा बटाटेवडे, मक्याची कणसं याकडे आपसूक मोर्चा वळतो. नुकतीच शाळेला सुरु झाल्याने आम्हा मुलांमध्ये देखील नवीन कपडे, पुस्तकं, शाळेची बस, नवीन वर्ग मित्र मैत्रिणी याची मज्जा असते. विशेष म्हणजे पावसात दिसणारे इंद्रधनुष अतिशय सुंदर असते.
मात्र गेल्या काही वर्षात पावसाळा आला की काहीशी धडकी मनात भरते. अचानक ठप्प होणारी वाहतूक, कोसळणारे पूल, नद्यांना येणारे पूर यामुळे विस्कळीत होणारे जीवनमान पाहता पावसाळा चांगला की वाईट असा विचार मनात येतो. पावसाळा आला की आई आम्हा मुलांना शक्यतो बाहेर जाण्यासाठी मनाई करते. पिकनिकला जाण्याचा विचार सुद्धा करता येत नाही. लॉकडाऊनमुळे शक्यतो घरातच असल्यामुळे पावसाळ्यातील पिकनिक हवीहवीशी वाटते. निसर्गात होणारे हे बदल खरंतर माणसामुळे होत असल्याचेही आई सांगते. वाढणारे तापमान, अवेळी होणारा वर्षाव याबद्दल शिक्षक देखील आम्हाला सांगतात. यावर उपाय म्हणून आम्ही मुलांनी शाळेच्या आवारात आणि घरात मुलांना संगोपन करता येतील अशी झाडे लावायला सुरुवात केली आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आम्ही मुले खारीचा वाट उचलत आहोत.

  • निबंध ३: माझ्या आवडीची पावसाळ्यातील सहल (Essay On Picnic In Rainy Season In Marathi)

पावसाळा सुरु झाला अनेक गोष्टींचे बेत तयार होऊ लागतात. शाळेला मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये हमखास एखादी तरी पिकनिक किंवा वर्षासहल व्हावी अशी आम्हा मुलांची इच्छा असते. शाळेच्या खिडकीतून ढगाळलेले वातावरण पाहता मन आपसूक एक भन्नाट सहलीची कल्पना करायला लागते. शाळेतील ही कुजबुज घरी आई बाबांना सांगितली की त्यांच्याकडून परवानगी मिळेपर्यंत मनात धाकधूक असते. अशाच एका सहलीत औरंगाबादच्या प्रसिद्ध अजिंठा वेरूळच्या प्रसिद्ध लेणी पहायला गेलो होतो. औरंगाबाद जिल्ह्यात या लेण्या आहेत. शाळेतून भल्या पहाटे निघालेली ही सहल अविस्मरणीय होती. मुंबई सोडताच लागणारी हिरवीगार झाडे, कधी रिमझिम तर कधी धो धो कोसळणारा पाऊस नयनरम्य दिसत होता. सहलीच्या बसमध्ये बसलेले सगळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील मजा मस्ती खूप धमाल उडवून देणारी होती. सर्व मित्रांनी आणलेला खाऊ पिकनिकची लज्जत अधिक वाढवणारा होता. अशी वर्षांशील वर्षातून दोनदा काय अनेकदा व्हावी असेच अनेकदा मनात येत होते. अजिंठा वेरूळच्या लेण्या पाहून एक क्षण आम्ही मुले थबकलो. इतके सुंदर कोरीव काम, नाजूक मूर्ती अतिशय नयनरम्य होत्या. हे सुंदर काम पाहताना आमचा वेळ कुठे निघून जात असे ते कळायचे नाही. जेवणासाठी मुलांची बसलेली एकत्र पंगत, रात्रीचा कॅम्प फायर आमच्या नेहमी लक्षात राहील. दोन दिवस घर, अभ्यास, क्लास, आई बाबा, सगळं विसायला लावणारी अशी वर्षासहल माझी खूप प्रिय आहे.
(Essay On Picnic In Rainy Season In Marathi)
सहलीत सर्व गोष्टी एकट्याने केल्या असल्यामुळे त्याची सुद्धा गमंत वेगळीच होती. पिकनिक संपवून परतीचा प्रवास सुरु झाला आणि सगळ्यांचे चेहरे काहीसे हिरमुसले. इतके सुंदर ठिकाण सोडून जाण्याची तशी कोणाचीच इच्छा नव्हती. मात्र एक वेगळा अनुभव आणि बरेच किस्से सांगण्यासाठी आम्ही पार्ट जात आहोत.
  • निष्कर्ष
(Essay on Rainy Season in Marathi) पावसाळावरती निबंध लिहिणे मुलांना काहीसे कंटाळवाणे वाटू शकते मात्रउपलब्ध केलेल्या या माहितीमुळे मुलांची अडचण काहीशी कमी होणार आहे.
निसर्गाचे ऋतुचक्र हे नेहमी चालत असते आणि त्यानुसार मानवी जीवन बदलत असते. यावरून आपल्याला निसर्ग आणि माणूस यांचे नाते अबाधित असल्याचे दिसून येते. मुलांना आवडणारा पावसाळा बऱ्याच अर्थाने बदलला आहे. सभोवतालच्या परिस्थितीमुळे वातावरणातील चांगले वाईट बदल मुलांच्या निबंधातून स्पष्ट देखील होतात.

Essay on Rainy Season in Marathi: शालेय मुलांसाठी पावसाळावरती निबंध. Essay on first rain in Marathi. Paus Nibhand In Marathi . आपली प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

हे पण वाचा:

1 to 100 numbers in Marathi

Next Story