Janmarathi

My School Essay In Marathi ; माझ्या आयुष्यातील पहिले वंदनीय ठिकाण ; माझी शाळा

My School Essay In Marathi ; प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळा आणि कॉलेज हे सुवर्ण अक्षरात कोरली जाणारे अध्याय आहे. त्यावेळच्या आठवणी कधीही न पुसणाऱ्या असतात. पिढ्यानपिढ्या गिरवला तोच कित्ता कितीही सारखा असला तरीही कंटाळवाणा वाटत नाही. शाळा आणि त्यासंबंधी अनेक आठवणी आपल्यासाठी स्पेशल असतात. या निबंधाच्या माध्यमातून या अशा आठवणींना उजाळा मिळणार आहे.

My School Essay In Marathi ; माझ्या आयुष्यातील पहिले वंदनीय ठिकाण ; माझी शाळा
X

My School Essay In Marathi ; माझ्या आयुष्यातील पहिले वंदनीय ठिकाण ; माझी शाळा

My School Essay In Marathi ; माझ्या आयुष्यातील पहिले वंदनीय ठिकाण ; माझी शाळा

My School Essay In Marathi ; माझी आवडती शाळा

प्रस्तावना (My School Essay In Marathi)

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळा आणि कॉलेज हे सुवर्ण अक्षरात कोरली जाणारे अध्याय आहे. त्यावेळच्या आठवणी कधीही न पुसणाऱ्या असतात. पिढ्यानपिढ्या गिरवला तोच कित्ता कितीही सारखा असला तरीही कंटाळवाणा वाटत नाही. शाळा आणि त्यासंबंधी अनेक आठवणी आपल्यासाठी स्पेशल असतात. या निबंधाच्या माध्यमातून या अशा आठवणींना उजाळा मिळणार आहे.

My School Essay In Marathi ; माझी शाळा ; कधीही न पुसता येणाऱ्या आठवणींचा खजिना

आयुष्यात किती मोठे झालो किंवा होण्याची स्वप्न पाहिली तरी घराच्या उंबरठ्यातून बाहेरच्या दुनियेत पहिले पॉल टाकताना ते शाळेच्या प्रांगणात पडते यात शंका. बालवाडी ते दहावी पर्यंत आयुष्यातील एक तप आपण सगळे पूर्ण करतो. आयुष्याचा आणि महत्त्वाचे म्हणजे माणूस म्हणून घडण्याचा पहिला टप्पा शाळाच असते. माझ्या आयुष्यातील शाळेचे ते सुवर्ण दिवस आयुष्यात येण्याऱ्या संकटाना धीराने सामोरे जाण्याचे बळ देतात. ज्याची सर इतर कोणत्याही गोष्टीला नाही. माझी शाळा सरस्वती न्यू इंग्लिश स्कुल, मुंबई. (My School Essay In Marathi)
''खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे'', शाळेच्या मुख्यप्रवेशद्वारातून आत गेल्यावर मोठ्या ठळक अक्षरात लिहिलेले हे वाक्य लहान असताना आमच्या साठी देखील तितकेच साधे होते. ज्याचा अर्थ आणि गरज आज कळतेय. शाळेत प्रवेश करण्याआधी येणारी माँ सरस्वतीची मूर्ती आजही आम्हा मुलांसाठी अतिशय वंदनीय होती. शाळेतील शिक्षक देखील या मूर्ती समोर नतमस्तक व्हायचे. तीन मजली आमची शाळेची इमारत अनोख्या अनुभवांचा खजिना आहे. सकाळ आणि दुपार अधिवेशनाला येणारी मुले, शिक्षक, इतर कामगार वर्ग आम्हाला तोंडपाठ असायचा. माझ्या पाठची इतर भावंडे त्याच शाळेत असल्याने ते नित्याचेच होते. (My School Essay In Marathi)
हा शाळेचे मोठे प्रांगण आम्हा मुलांसाठी नाचणे, बागडे, मनसोक्त खेळण्यासाठी नेहमीच सज्ज असायचे. मैदानाच्या सभोवताली असलेली छोटीशी बॅग देखील आमच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू आहे. त्यात लिहिलेल्या निवडक पाट्या, फुले तोडू नये किंवा झाडांना इजा करू नये शाळेतील टारगट मुलांसाठी सूचना वजा इशाराच होती. तसेच मुख्याध्यापकांच्या ऑफिसची खिडकी नेमकी त्याच दिशेने खुलणारी असल्याने आमच्यावर लाईव्ह कॅमेरा होता. ज्यांच्या नजरेतून काहीही सुटत नाही अशा मुख्याध्यापिका इरावती देशमुख बाई यांचा संपूर्ण शाळेत दरारा कायम आहे. (Mazi Shala Essay In Marathi)
शाळेतील शिक्षक आणि त्यांची संबंधित विषयातील खासियत आम्हा मुलांना शिकवण्यात कधीही कमाई पडत नाही. काही शिक्षक नेहमी आमच्या स्मरणात राहतील. त्यांच्या लकबी आणि सवयी अनेकदा चेष्ठेचा विषय ठरतात. त्यांच्या विषयी आम्हा मुलांमध्ये गप्पा देखील रंगतात. अशी माझी आवडती शाळा माझ्या घराजवळच असल्याने शाळेत निवांतपणे जाणे आणि येरोजची पर्वणीक आहे. शाळेतील मित्रांसोबत एकत्र अभ्यास किंवा नाचाचा सराव, प्रकल्पावर काम करण्यासाठी माझे घर सगळ्यांचा अड्डा आहे. (My School Essay In Marathi)
आजकाल कितीही अलार्म क्लॉक बाजारात नवीन आले शाळेची घंटा वाजली खडबडून जागे झालेच पाहिजे. असा घंटानाद क्वचित परत कधी पहायला मिळेल यात शंका आहे. मला तर कधी चुकीचे काम करण्यापासून परावृत्त करणारी घंटा देखील वाटते. शाळेतील वर्ग, फळा, बेंच, शिक्षकांचे टेबल खुर्ची स्वच्छ ठेवणे, बाहेरच्या ठिकाणी टापटीपपणा ठेवणे याची सवय आम्हाला याच गोष्टीमुळे लागली आहे. शाळेतील प्रयोग शाळा, वाचनालय, स्टोररूम सगळे काही आमच्या अखत्यारीत असल्यासारखे वाटते. शाळेत लपण्याच्या जागा, अनोख्या युक्त्या एकच ठिकाणी सुचतात अशी माझी शाळा मला खूप आवडते आणि नेहमी आवडत राहील.

निष्कर्ष (my school essay in marathi)

शाळेचे महत्त्व अस्थित्व आपल्या आयुष्यातून कधीही न संपणारे आहे. हा सुवर्णकाळ प्रत्येकाच्या आयुष्यात मोठा असतो. त्यामुळे या विषयावरील निबंध कसा वाटला याबाबत नक्की प्रतिक्रिया कळवा. (my school essay in marathi,mazi shala essay in marathi)

हे पण वाचा (My School Essay In Marathi

Next Story