Rainwater Harvesting Essay In Marathi : पावसाच्या पाण्याचा सदुपयोग म्हणजे रेन वोटर हार्वेस्टिंग Essay on first rain in Marathi
Rainwater Harvesting Essay In Marathi , Essay on first rain in Marathi शालेय मुलांसाठी पावसाळावरती निबंध

X
Rainwater Harvesting Essay In Marathi : पावसाच्या पाण्याचा सदुपयोग म्हणजे रेन वोटर हार्वेस्टिंग
Shreekala Abhinave12 Oct 2021 8:17 AM GMT
Rainwater Harvesting Essay In Marathi : पावसाच्या पाण्याचा सदुपयोग म्हणजे रेन वोटर हार्वेस्टिंग
माझा आवडता पहिला पाऊस (Essay on first rain in Marathi)
Rainwater Harvesting Essay In Marathi
Rainwater Harvesting Essay In Marathi
प्रस्तावना : पाणी आडवा आणि पाणी जिरवा हे सूत्र रेन वोटर हार्वेस्टिंगसाठी पूरक आहे. हा प्रकल्प पाणी टंचाई आणि त्यासंदर्भातील समस्यांसाठी उपयुक्त आहे. आपल्याला नेहमीच सुखावणारा पाऊस संपल्यावर येणाऱ्या अडचणी कमी होणेसाठी याची मदत होत. तापलेल्या सूर्यामुळे शरीराची लाहीलाही कमी करणारा हा पाऊस प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो. मात्र अशा पावसाचा उपयोग कशा प्रकारे करता येईल हे खालील निबंधातून केले आहे. त्यानिमित्त (Rainwater Harvesting Essay In Marathi) पावसाळा वरती निबंध (Essay on first rain in Marathi) उपलब्ध केले आहेत.
निबंध 1
Rainwater Harvesting Essay In Marathi : रेन वोटर हार्वेस्टिंग पाणी टंचाईवर रामबाण इलाज
पावसाळा आपल्या सगळ्यांना आनंदी अल्हाददायक आणि प्रसन्न वातावरण तयार करणारा असला तरीही गेल्या काही वर्षात पावसाचा अंदाज बदलत चालला आहे. वेळीअवेळी पडणारा पाऊस यामुळे अनेक गोष्टी बदल्या आहेत. त्यामुळे पाणी टंचाई, दुष्काळ असे काही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून पाण्याचा मुबकल पुरवठा व्हावा म्हणून धरण, तलाव कालव्यांची रचना केली आहे. पावसाचे पाणी अडवण्यासाठी ही उपाययोजना केली जाते. मात्र जून 2019 पर्यंत भारतातील जवळपास 65% जलसाठे कोरडे झाले आहे. ही परिस्थिती काहीशी चिंताजनक आहे. विशेषतः लोकसंख्या वाढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उत्तम आणि रामबाण उपाय म्हणून रेन वोटर हार्वेस्टिंगचा पर्याय निवडला जात आहे. पावसाच्या पाण्याचा बऱ्याच गोष्टींसाठी वापर करता येतो.रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीमध्ये पावसाचे पाणी गोळा करण्याची प्रक्रिया केली जाते. पावसाचे जमलेले पाणी गाळले जाते आणि नंतर वापरासाठी साठवले जाते. विशेष म्हणजे अशा साठवणीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी सामान्य राखण्यास मदत होते. अशा प्रकल्पना शासकीय मदत देखील केली जाते. रेन वोटर हार्वेस्टिंग मधील पाण्यात कमी दूषित घटक असतात आणि ते हलके/मऊ पाणी असते.म्हणून आपण कपडे धुणे, भांडी घासणे, आपली चारचाकी धुणे, आंघोळ करणे, स्वच्छतागृहे इत्यादीसारख्या सर्व गोष्टींसाठी हे पावसाचे पाणी वापरू शकतो. थोडक्यात, जेव्हा आपण पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरवतो तेव्हा ते स्थानिक लोकांसाठी फायदेशीर ठरते.
निबंध २
माझा आवडता पहिला पाऊस (Essay on first rain in Marathi)
दरवर्षी पाऊस येतो. मात्र पहिल्यांदा पडणारा पाऊस आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. मला देखील तो खूप आवडतो. उन्हामुळे ओसाड झालेली जमीन प्रफुल्लित होते. थंडगार पाण्याच्या वर्षावाने जमिनीचा झालेला दाह कमी होते आणि हवेतही गारवा पसरतो. पावसामुळे तयार झालेली छोटी छोटी तळी लहानमुलांचे खास आकर्षण असतात. ओसंडून वाहणारे धबधबे, नद्या पाहण्यासाठी पर्यटक लांबून तसेच आवर्जून अशा स्थळांना भेटी देतात. मला मात्र घरच्या खिडकीतून कोसळणारा पाऊस पहायला खूप आवडतो, त्याची चित्रे काढणे, निसर्गाचे सौंदर्य टिपणे मला खूप आवडते. पावसातील हा एक दिवस मी मनसोक्त अनुभव घेतो. विशेष म्हणजे भारताची शान म्हणून ओळखले जाणारे शेतकरी बांधव यांच्यासाठी पावसाळा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी केलेल्या पेरणीला पाणी याच पावसामुळे मिळते. पहिल्यांदा पडलेल्या पावसामुळे येणारा मातीचा मनमोहक सुगंध अनेकांना मोहून टाकतो. आम्ही शाळकरी मुले मात्र पावसाळा चालू झाला की वेगळ्याच खुशीत असतो. पावसासाठी कोणकोणत्या वस्तू विकत घ्यायचे प्लनिंग करतो. पावसातील तो एक दिवस खूप वेगळा असतो. पावसामुळे होणाऱ्या अनेक गमती जंमती पहायला मिळतात. निसर्गाचे अप्रतिम रूप आणि देणगी आहे पावसाळा ऋतू. (Rainwater Harvesting Essay In Marathi)
निष्कर्ष (Rainwater Harvesting Essay In Marathi)
रेन वोटर हार्वेस्टिंगमुळे होणारे फायदे पावसाळावरती निबंध लिहिणे मुलांना काहीसे कंटाळवाणे वाटू शकते मात्र उपलब्ध केलेल्या या माहितीमुळे मुलांची अडचण काहीशी कमी होणार आहे. निसर्गाचे ऋतुचक्र हे नेहमी चालत असते आणि त्यानुसार मानवी जीवन बदलत असते. यावरून आपल्याला निसर्ग आणि माणूस यांचे नाते अबाधित असल्याचे दिसून येते. मुलांना आवडणारा पावसाळा बऱ्याच अर्थाने बदलला आहे. सभोवतालच्या परिस्थितीमुळे वातावरणातील चांगले वाईट बदल मुलांच्या निबंधातून स्पष्ट देखील होतात. (Essay on first rain in Marathi) Paus Nibhand In Marathi. आपली प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.
हे पण वाचा
Next Story