Shivaji Maharaj Essay In Marathi ; रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा
Shivaji Maharaj Essay In Marathi ; छत्रपती शिवाजी महाराज हे एक विलक्षण आणि अजिंक्य असे व्यक्तिमत्त्व होते. उत्तम राज्यकारभार, आखलेल्या गोष्टी शहाणपणाने आणि धीमेपणाने कृतीत उतरविल्या. त्याची कृती आणि आचरण अनेक पिढ्यांसाठी आदर्श आहे.

X
Shivaji Maharaj Information In Marathi Essay ; स्वराज्याचा श्रीगणेशा करणारे लहानपणीचे शिवराय
Shreekala Abhinave2022-02-26 09:08:16.0
Shivaji Maharaj Information In Marathi Essay ; स्वराज्याचा श्रीगणेशा करणारे लहानपणीचे शिवराय
प्रस्तावना ; (Shivaji Maharaj Essay In Marathi)
छत्रपती शिवाजी महाराज हे एक विलक्षण आणि अजिंक्य असे व्यक्तिमत्त्व होते. उत्तम राज्यकारभार, आखलेल्या गोष्टी शहाणपणाने आणि धीमेपणाने कृतीत उतरविल्या. त्याची कृती आणि आचरण अनेक पिढ्यांसाठी आदर्श आहे.
Shivaji Maharaj Essay In Marathi ; रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा
Shivaji Maharaj Essay In Marathi ; रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा
आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Essay In Marathi)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कीर्तीचा डंका गेली चारशे वर्ष महाराष्ट्रात वाजत आहे. स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून निर्माण केलेला इतिहास आमच्या आणि आमच्या पुढील अनेक पिढ्यांसाठी अजरामर आहे. स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचे धडे महाराष्ट्रातील जनतेला आणि प्रत्येक लहान मुलांना छत्रपतींच्या थोरवीतून बाळकडू पाजले जाते. शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ यांचे सूर्यासारखे तेजस्वी पुत्र शिवाजी महाराज यांची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे. मोगल साम्राज्याची चाकरी झुगारून स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि सत्यातही उतरवले. रायरेश्वराच्या मंदिरात त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्य संस्थापक, थोर कर्तृत्ववान पुरुष, श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी शून्यातून उभी केलेली स्वराज्य निर्मिती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj Essay In Marathi)
शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. राजमाता जिजाबाईंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. त्यांचे वडिल शहाजीराजे भोसले मोगल कारभारात सरदार म्हणून कार्यरत होते. महाराजांचे बालपण अति संस्कारित असे घडले होते. दादोजी कोंडदेव यांची शिकवण त्यांना लाभली. वयाच्या १४-१५ वर्षापर्यंत त्यांनी नीतिमत्ता, राज्यव्यवस्था, युद्धकला, गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकली. कधीकधी आसपास राहणारी मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत असत. मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी आणि मातब्बर विश्वासू सरदार मावळे देखील. (Short Essay On Chhatrapati Shivaji Maharaj In Marathi)
राजमाता जिजाऊ यांनी धर्मग्रंथातील ज्ञान आणि त्यातील शिकवण बाल शिवाजींना गोष्टी स्वरूपात सांगितली. त्यातूनच मग उच्च कोटीचा पराक्रम आणि प्रजादक्षता गुण लहानपणीच शिवाजींच्या अंगी आले. शिवरायांचे लग्न किशोर वयातच झाले होते. जिजाऊंचे माहेर फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई हिला भोसले घराण्याची सून म्हणून पसंत केले. शिवराय मोठे असताना त्यांना परकीय सत्तांद्वारे रयतेवर केला जाणारा छळ समजत होता. याचाच परिणाम म्हणून स्वराज्याचे बीज त्यांच्या मनात रुजले. (Shivaji Jayanti Essay In Marathi)
मुघल सत्ता मोठ्या प्रमाणात सक्रिय असताना त्यांच्या विरोधात लढण्यासाठी शिवरायांनी दंड थोपटले. याची मुहूर्तमेढ महाराजांनी पुण्यातील किल्ले तोरणा अत्यंत लहान वयात जिंकला. त्यांनतर स्वराज्याची पताका अटकेपार रोवली गेली. प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने आणि शौर्याने त्यांनी तोंड दिले. "अफजलखान वध", " शाहिस्ते खानाची बोटे कापणे" या प्रसंगांतून त्यांचा पराक्रम आजही आम्ही विद्यार्थी पाठ्य पुस्तकातून वाचतो. स्वकीय शत्रूंना देखील शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला. याव्यतिरिक्त पुरंदरचा तह, आग्रातील अटक आणि सुटका या बिकट प्रसंगी देखील संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वश्रुत आहे.
शिवरायांच्या मराठा साम्राज्याचे यश त्यांच्या विश्वासू आणि जबाबदार मंत्री मंडळ आणि सरदाराच्या इमानदारीत आहे. प्रत्येक प्रसंगात मावळे जिकरीने पुढे आले आणि शिवरायांसाठी प्राणाची आहुती देण्यासाठी सज्ज होते. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारबाजी या शूरवीरांचे नाव आवर्जून घेता येईल. इ. स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि महाराष्ट्राला रयतेला राजा छत्रपती मिळाला. राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. त्यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र स्वराज्यात व्यवहाराकरिता चलन सुरू झाले. आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा आखून राबवल्याही जात होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आणि शूर पराक्रम सर्वत्र दुमदुमत होता. अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत मालवली. असा हा अद्भुत राजा, राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज स्वतःच्या कर्तुत्वाने"छत्रपती" म्हणून रयतेच्या सर्वानुमते अनंत काळासाठी अजरामर झाला.
स्वराज्याचा श्रीगणेशा करणारे लहानपणीचे शिवराय (Essay On Childhood Of Shivaji Maharaj In Marathi Language)
तेजपुंज, परमविक्रमी शूरवीर शिवाजी महाराज हे देखील हाडामासाचे होते मात्र त्यांच्यावर झालेले संस्कार आणि त्यांना मिळालेले शिक्षण अतिशय निपुण आणि अतुलनीय शिक्षकांकडून मिळाले होते. महाराजांची आई राजमाता जिजाऊ, दादोजी कोंडदेव, यासारखे भविष्याचा वेध घेणारे शिक्षक लाभले. महाराजांचे बालपण शिवनेरी, माहुली (ठाणे जिल्हा) व पुणे येथे गेले. बंगलोरमध्ये
ते काही काळ राहिले. शहाजी राजे यांनी मुलगा शिवाजी आणि पत्नी जिजाबाई यांच्याकडे महाराष्ट्रातील जहागिरीची व्यवस्था सोपवून त्यांना पुण्याला पाठवून दिले. पुण्यातील जहागिरीची प्रत्यक्ष व्यवस्था पाहण्यासाठी शहाजींनी दादोजी तथा दादाजी कोंडदेव हे त्याचे दोन विश्वासू सरदार यांची देखील पाठवणी केली. जिजाबाईंच्या ठायी असलेला देशाभिमान, करारीपणा आणि कठीण प्रसंगांतून निभाऊन जाण्यासाठी लागणारे धैर्य हे गुण शिवाजी राजांकडे देखील आले. कोंडदेव बंधू सरदारांच्या शिकवणीतून शिवाजीराजांना स्वराज्यस्थापनेची स्फूर्ती मिळाली. आपल्या जहागिरीच्या संरक्षणासाठी सर्वप्रकारच्या युद्ध कला अवगत केल्या. दादोजी कोंडदेव यांच्या मृत्युनंतर (१६४६-४७) शिवाजीराजांनी जहागिरीचा कारभार हाती घेतला. त्यांनी गड आणि किल्ले आपल्या ताब्यात घेण्यासाठी अनेक मोहिमा आखून यशस्वी रीत्या पार पाडल्या. या कामात त्यांना जिजाऊ मातोश्रींचे आशीर्वाद आणि पाठबळ होतेच. (Sivaji Jayanti Essay In Marathi)
महाराजांनी पुणे आणि बाजूच्या परिसरात मोकळ्या टेकड्या, पडके किल्ले, दुर्गम स्थळे हळूहळू आपल्या अखत्यारीत घेऊन सुरक्षित केली. वयाच्या सोळाव्या वर्षी राजगड आणि तोरणा किल्ला (प्रचंडगड) महाराजांनी जिंकला आणि स्वराज्याचा ध्वज फडकावला. महाराजांना येऊन मिळालेल्या अनुयायांत पुढे प्रसिध्दीस आलेली कान्होजी जेधे, नेताजी पालकर (समकालीन कागदपत्रांनुसार नेतोजी पालकर), तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर इ. नावे आढळून येतात. भोरजवळ रोहिडेश्वरासमोर स्वराज्यनिष्ठेची शपथ घेतल्याची कथा ही याच सुमारास असावी.
निष्कर्ष ; (Shivaji Maharaj Essay In Marathi)
शिवाजी महाराजांचे बालपण आणि कारकीर्द याच्याबद्दल नमूद केलेला माहितीपर निबंध या लेखाच्या माध्यमातून मांडला आहे. हा कसा वाटला याबद्दल कमेंट करा आणि शेअर करा.
हे पण वाचा (Shivaji Maharaj Essay In Marathi)
Next Story