Janmarathi

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा 2021 महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींशी संवाद

केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी वर्चुअल माध्यमाच्या सहाय्याने देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला महिला नेतृत्व या विषयावर संभाषण झाले.

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा 2021 महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींशी  संवाद
X

आज ८ मार्च २०२१ महिला दिनानिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरील निशंक यांनी विडिओ कॉन्फरेन्सच्या माध्यमाने देशातील विद्यार्थिनींशी संवाद साधला. हा कार्यक्रम दिल्ली येथे पार पडला, यासाठी विविध शिक्षण अधिकारी, देशातील विविध भागातील निवडक विद्यार्थिनी इ. उपस्थित होते. 'नेतृत्वाच्या क्षेत्रात महिला' असे या कार्यक्रमाचे शीर्षक होते. कार्याक्रमाच्या सुरुवातीला डेहराडून, मेहसाणा, कोची, गुवाहाटी, लेह, येथील काही विद्यार्थिनींनी भारतीय महिलांचे विविध क्षेत्रातील स्थान व त्यांची स्वतःची स्वप्ने यावर भाषण केले.

त्यानंतर माननीय शिक्षण मंत्र्यांनी एन. बी. ती. द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'ग्राफिक उपन्यासाचे' अनावरण केले. यामध्ये देशातील १३ राज्यातील ५० निवडक सी. बी. स. सी. शाळांमधील विध्यार्थ्यानी लिखित विविध उपन्यास जे १२ विविध शैक्षणिक विषयावर आधारित आहेत त्यांचा संग्रह करण्यात आला आहे. या ग्राफिक उपन्यासाचे लोकार्पण नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या आधारावर करण्यात आल्याचे या कार्यक्रमात सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. रमेश पोखरियाल यांनी विद्यार्थिनींना उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण हे व्यापक विचारांचे व भारत केंद्रित आहे असे सांगितले. तसेच यातून भारताची 'वसुधैव कुटुंबकम' या विचारसरणी देखील दिसून येते असे त्यांनी सांगितले. एन. ए. पी. २०२० चा उद्धेश ' महामानव' तयार करणे आहे असेही त्यांनी म्हटले. यातुन कोणाचेही भविष्य दुखी होणार नाही असा संकल्प सरकार करत आहे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांच्या मुलींचा देखील उल्लेख करत असताना त्यांनी सांगितले , त्यांच्या तिन मुली नृत्यांगना, कप्तान, विधी क्षेत्रात कार्य करत असून अशीच प्रगती भारतातील सर्व मुलींनी करावी असेही ते म्हणाले.कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी ' जो ठाण लो वो होता जरूर है' असे म्हणत मुलीना उमेद दिली.


Next Story