Janmarathi

हार्ट अटॅकमुळे बॉलीवूडने गमावले मोठे स्टार; यादी पाहून तुम्हीही चकित व्हाल....!

हार्ट अटॅकमुळे बॉलीवूडने गमावले मोठे स्टार; यादी पाहून तुम्हीही चकित व्हाल....!
X

हार्ट अटॅकमुळे बॉलीवूडने गमावले मोठे स्टार; यादी पाहून तुम्हीही चकित व्हाल....!

आजकालच्या धावपळीच्या जीवनात सामान्य माणूस असो की श्रीमंत असो किवां सिनेसृष्टीतील कलाकार प्रत्येकजण ताणतणावाचे जीवन जगत आहे. याला कारण म्हणजे वाढलेली स्पर्धा आणि रोजचा तणाव कारणीभूत आहे. या कामाच्या ताणतणावामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी कमी वयातच वेगवेगळ्या आजाराना सामोरे जावे लागते. सध्या हृदयविकाराचे प्रमाण इतके वाढले आहे कि, या हृदयविकाराच्या झटक्याने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचे निधन झाले आहे. ज्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली. चला तर मग जाणून घेऊयात हृदयविकाराच्या झटक्याने कोणत्या स्टार कलाकारांनी आपला जीव गमवला आहे.

१) सतीश कौशिक: जेष्ठ अभिनेते सतीश कौशिक हे अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, विनोदकार आणि पटकथा लेखक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आहे. त्यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ज्याची माहिती अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर ट्विट करून दिली.

२) राजू श्रीवास्तव: कॉमेडीच्या दुनियेवर राज्य करणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. २१ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना बराच काळ एम्स रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.

३) श्रीदेवी: यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली लेडी सुपरस्टार म्हणून ओळखले जात होते. चित्रपटातील आयकॉनिक रोलमुळे श्रीदेवीने स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी २०१८ रोजी निधन झाले. दुबईतील हॉटेलच्या खोलीत त्या मृतावस्थेत आढळून आल्या होती. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे जाहीर करण्यात आले होते.

४) ओम पुरी: बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या ओम पुरी यांनाही हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमवावा लागला. ६ जानेवारी २०१७ रोजी त्यांचे निधन झाले.

५) रीमा लागू: चित्रपटसृष्टीत ‘आई’च्या भूमिकेसाठी प्रसिद्ध झालेल्या रीमा लागू यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १८ मे २०१७ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

६) सिद्धार्थ शुक्ला: बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्ला आणि याच शोमुळे शहनाज गिलसोबत रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. २ सप्टेंबर २०२१ रोजी, ४० वर्षीय सिद्धार्थला हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमवावे लागले.

७) केके: गायक कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ ​​केके यांचे ३१ मे २०२२ रोजी कोलकाता येथे एका म्युझिक शो दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते फक्त 53 वर्षांचे होते.

Next Story
Share it