Janmarathi

आलिया भट्टचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी कॉंग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी केली आहे.

आलिया भट्टचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे.
X

संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी कॉंग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी केली आहे. या चित्रपटातून काथियावाडी शहराचे नाव खराब होईल असे ते म्हणाले.

कामठीपुरा हे नाव लोकांमध्ये रेड लाईट क्षेत्र म्हणून बदनाम होते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणची प्रतिमा बदलली आहे. अशा परिस्थितीत या जागेचे नाव चित्रपट आणि वेब मालिकेत पुन्हा उघडकीस आल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे.दक्षिण मुंबईतील मुंबादेवीचे आमदार असलेले पटेल यांनी विधानसभेत राज्य सरकारला सांगितले की." तेथील महिलांनी विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. चित्रपटाचे नाव काठियावाड शहर बदनाम करीत आहे. चित्रपटाचे नाव बदलले पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे.

आलिया भट्ट स्टारर फिल्म 'गंगूबाई काठियावाडी' येत्या 30 जुलै रोजी देशभरात प्रदर्शित होईल. 'गंगूबाई काठियावाडी' ही कथा कामठीपुरा येथील एका वेश्यागृहातील मॅडम गंगूबाई कोठेवली यांच्या जीवनावर आधारित आहे. हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकाच्या एका अध्यायांवर हा चित्रपट बनविला गेला आहे.अजय देवगनसुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. कथा साठच्या दशकात सांगितली गेली आहे.


Next Story