जॉनी लिव्हर आणि त्यांच्या आईने घेतली कोरोना वैक्सिन, फोटो केले सोशल मीडिया वर वायरल
जॉनी लिव्हर आणि त्यांची आई यांनी कोरोना वैक्सिन घेतली. व फोटो सोशल मीडिया वर शेअर केले.

जॉनी लिव्हर यांनी आज आपल्या आईबरोबर कोरोना वैक्सिन घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यात त्यांनी काल मी आणि माझ्या आईने कोरोना लस घेतली. असे कॅप्शन देऊन फोटो शेअर केला.
त्याफोटोत जॉनी लिव्हर आणि त्यांच्या आई या खुर्चीवर बसल्या दिसत असून इतर कर्मचारी बाजूला असल्याचे दिसून येतात.
यापूर्वीही जॉनी लिव्हर यांनी कोरोना शी संबंधित विनोदी व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केले होते. आणि त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. जॉनी लिव्हर यांच्या त्यांच्या आईसोबतच्या या कोरोना लसीच्या फोटोलाही चाहत्यांकडून भरपूर लाईक्स मिळाले आहेत.
जसकी आपल्याला माहिती आहे की जॉनी लिव्हर हे एक विनोदी कलाकार आहेत. त्यांचं विनोदी वृत्ती मुळेच लोक त्यांना भरपूर पसंत करतात. जॉनी लिव्हर हे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट् वर भरपूर सक्रिय असतात.
लवकरच जॉनी लिव्हर यांचे दोन सिनेमे मुंगीलाल रॉक्स आणि आप जैसा कोई नहीं हे सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.